शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक योजनेत ५२ टक्केच खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:15 IST

जिल्हा वार्षिक योजनेत शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी केवळ ५२.१९ कोटी रुपयांचाच खर्च झाला आहे. आगामी काळात आचारसंहिता लागणार असल्याने तत्पूर्वी हा निधी खर्ची पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी कामाला गती देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा वार्षिक योजनेत शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी केवळ ५२.१९ कोटी रुपयांचाच खर्च झाला आहे. आगामी काळात आचारसंहिता लागणार असल्याने तत्पूर्वी हा निधी खर्ची पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी कामाला गती देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. यावेळी वार्षिक योजनेतील सर्वसाधारण घटकात केवळ ५२ टक्केच निधी खर्च करण्याचे प्रमाण असल्याचे आढळले. यात कृषी विभागाच्या पीकसंवर्धानात ६.६६ पैकी २.८९ कोटी, मृदसंधारणात २.५0 पैकी १.0४ कोटी, पशुसंवर्धानात २.३५ पैकी १.३५ कोटी, वन विभागाचे ३.५0 पैकी २.३३ कोटीच खर्च झाले. सहकाराचा छदामही खर्च नाही. यात १६ पैकी ७.६५ कोटींचाच खर्च आहे. ग्रामविकासात ४.३७ पैकी २.८२ कोटींचाच खर्च झाला आहे. लघुपाटबंधारे स्थानिक स्तरने तर ४.५७ कोटींपैकी रुपयाही खर्च दाखवला नाही.पूरनियंत्रणावर ३0 पैकी २१ लाख खर्च पडले. सामाजिक सेवांमध्ये शिक्षणचा ३.२५ पैकी २.२४ कोटी, क्रीडाचा ७६ पैकी ४४ लाख, ग्रंथालय विभागाचा २६ पैकी ७ लाख, कामगार कल्याणचा ३0 पैकी २१ लाख, आरोग्य विभागाचा ३.९६ पैकी २.४0 कोटी खर्च झाला. पाणीपुरवठा विभागाने १३ कोटी रुपये घेतले असले तरीही खर्च मात्र तेवढा नाही. नगरविकासचा ६.२१ कोटींपैकी ६0 लाख तर मागासवर्गीयांच्या कल्याणावर १.0३ कोटींपैकी २ लाख खर्च झाले. या उर्जा विकासासाठी मंजूर २.७0 कोटींपैकी १.४0 कोटी खर्ची पडल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण व लघुउद्योगांसाठी ५७ लाखांपैकी ३९ लाख, रस्ते व पुलांवर १0 पैकी ३.५ कोटी, इमारतींवर ५.८0 पैकी ३.५९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तीर्थक्षेत्र विकासाचे ३.८२ तर पर्यटन विकासाचे ३ कोटींपैकी छदामही खर्च नाही. इतर योजनांसाठी १.२१ कोटी रुपये असून ४७ लाख खर्च झाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत १४.३५ पैकी १0 कोटी खर्च झाले. नवीन्यपूर्ण योजनेत ५ पैकी ३ कोटी खर्च झाले आहेत. हा खर्च दाखविला असला तरीही संबंधित विभागांना निधी वर्गच झालेला आहे. काही कामे सुरू तर काही सुरू होत आहेत.दरवर्षी जिल्ह्याचा निधी शंभर टक्के खर्च होतो. यंदाही ही परंपरा कायम राहिली पाहिजे अशा पद्धतीने कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीfundsनिधी