हिंगोली : शैक्षणिक वर्षात शाळा बंद होत्या. या दरम्यान शासनाच्या आदेशाप्रमाणे सरासरी ५० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे शिक्षकांना शाळेत बोलाविले जात होते, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद होत्या; परंतु या दरम्यान शिक्षकांना मात्र बोलाविले जात होते. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाईन वर्ग घेण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. त्याप्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गाची व्यवस्था केली होती. ऑनलाईन वर्ग सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान काही झाले नाही. शिक्षकांना मात्र शाळा बंद असली तरी शाळेत येणे बंधनकारक केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षण विभागाने राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू केले. या दरम्यान एकाही पालकांनी ऑनलाईन वर्गाबाबत तक्रार केली नाही, असेही शिक्षण विभागाने सांगितले.
प्रतिक्रिया
पालकांची तक्रार नाही
कोरोना काळात जिल्ह्यातील सर्वच शाळेत ५० टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यामुळे ५० टक्केच शिक्षक शाळेत हजेरी लावत होते. या दरम्यान कोणत्याही पालकांची ऑनलाईन वर्गाबाबत तक्रार आली नाही.
- पी. बी. पावसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी
सरासरी ५० टक्के उपस्थिती
जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शासनाच्या आदेशाप्रमाणे सरासरी ५० टक्के उपस्थिती होती. ऑनलाईन शिक्षणाबाबत कोणत्याही पालकांनी अद्यापपर्यंत तरी तक्रार केली नाही. कोरोनाचे नियम शाळांमध्ये पाळले जात आहेत.
संदीप सोनटक्के
- प्राथमिक शिक्षणािधकारी.
प्राथमिक शाळा १०२६
माध्यमिक शाळा ३०४
प्राथमिक शिक्षक ६२६६
माध्यमिक शिक्षक २२८१
तालुकानिहाय शिक्षक
प्राथमिक हिंगोली १४९०
सेनगाव १०११
वसमत १४९५
कळमनुरी १२९७
औंढा ९७३
माध्यमिक शिक्षक
हिंगोली ६०९
सेनगाव ३४२
वसमत ६२३
कळमनुरी ४६३
औंढा २४४
शिक्षक काय म्हणतात...
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आम्ही ऑनलाईन वर्ग घेतले. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन वर्गाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्नही केला. वेळोवेळी ऑनलाईनद्वारे अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या.
- ज्ञानेश्वर ठाकरे, शिक्षक.
कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन वर्ग सुरू होते. या दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश असल्यामुळे शाळेत येत होतो. कोरोनाचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गही घेतले. ऑनलाईनमध्ये काही अडचणी आहेत.
-मारोतराव घेणेकर, शिक्षक