शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

मग्रारोहयोत तब्बल ४७ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:38 AM

मागील आठवड्यात जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. तब्बल ४७ हजार साप्ताहिक मजूर अवतरले. वनविभागाच्या काही रोपवाटिकांवर तर मजुरांचा फुगवटा आल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय यात हिंगोलीसारख्या ठिकाणी मजुरीचीही बोंब आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या धाकापोटी मूकपणे सहन केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील आठवड्यात जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. तब्बल ४७ हजार साप्ताहिक मजूर अवतरले. वनविभागाच्या काही रोपवाटिकांवर तर मजुरांचा फुगवटा आल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय यात हिंगोलीसारख्या ठिकाणी मजुरीचीही बोंब आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या धाकापोटी मूकपणे सहन केले जात आहे.मग्रारोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या मे महिन्यात घटली होती. कडक उन्हामुळे परिणाम झाला की काय कोण जाणे? मात्र साप्ताहिक मजुरांची संख्या दहा ते पंधरा हजारांच्या घरात आली होती. आता जूनमध्ये पावसाळ्याचा महिना असतानाही मजुरांची संख्या वाढली आहे. यामध्ये यंत्रणांच्या ६६ कामांवर ६११0 मजूर आहेत. यात प्रामुख्याने वनविभागाच्या कामांचा समावेश आहे. यात हिंगोलीत १0 कामांवर ५७२, कळमनुरीत १८ कामांवर १३0२, सेनगावात १९ कामांवर १७३८, वसमतला १0 कामांवर १४३८ तर औंढ्यात ९ कामांवर १0६0 मजूर उपस्थिती आहे.उन्हाळ्यात बाहेर गावी कामे करून अनेक मजूर पावसाळ्याच्या तोंडावर गावातच शेतीकामे उपलब्ध होत असल्याने गावाकडे परततात. मात्र आता यांत्रिकीकरणामुळे गावातही मजुरांच्या हाताला फारशी कामे राहिली नाहीत. बैलजोडीवर पेरणी करणाºयांना मात्र मोठ्या प्रमाणात मजूर लावावे लागतात. परंतु शेतीत कामे कमी असल्याने मग्रारोहयोची मजूर उपस्थिती वाढावी, हेही कारण असू शकते. मात्र त्याची चाचपणी प्रशासनाकडून होते का? हा प्रश्न आहे.हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींना अचानकच मग्रारोहयोची कामे करण्याचा उल्हास आल्याचे पहायला मिळत आहे. यात हिंगोली तालुक्यात ४५ कामांवर ८६४२, कळमनुरीत ८0 कामांवर ४९५३, सेनगावात ९५ कामांवर १३७७६, वसमतला ३ कामांवर ४४ तर औंढा नागनाथ तालुक्यातील १९२ कामांवर १४ हजार १३८ मजूर असल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. कायम नकारघंटा वाजवणाºया पंचायत समित्यांचे पावसाळ्याच्या तोंडावर मनपरिवर्तन झाल्याचा सुखद धक्का अनेकांना बसला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgovernment schemeसरकारी योजना