शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक योजनेत ४२ कोटी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:11 IST

कर्जमाफीमुळे वार्षिक योजनेत झालेल्या ३0 टक्के कपातीचा फटका विविध विभागांच्या नियोजनाला बसला होता. मात्र आता शासनाने ही कपात रद्द केल्याचे पत्र दिल्याने जवळपास ४२ कोटी रुपये पुन्हा गंगाजळीत परतले असून विविध योजना मार्गी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्जमाफीमुळे वार्षिक योजनेत झालेल्या ३0 टक्के कपातीचा फटका विविध विभागांच्या नियोजनाला बसला होता. मात्र आता शासनाने ही कपात रद्द केल्याचे पत्र दिल्याने जवळपास ४२ कोटी रुपये पुन्हा गंगाजळीत परतले असून विविध योजना मार्गी लागणार आहे.३0 टक्के कपातीमुळे सर्वाधिक घोर लागला होता तो जि.प.तील पदाधिकाºयांना. विविध योजनांचे नियोजन करताना अत्यल्प निधीमुळे अडचणी येत होत्या. मात्र वेळेत नियोजन न केल्यास पुन्हा सदस्यांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येत होती. तरीही जि.प.च्या एक-दोन योजनांना कात्री बसू नये, यासाठी इतरत्रचा निधी वळताही झाला होता. मात्र सर्वच योजनांसाठी ते शक्य नव्हते. त्यामुळे विविध समित्यांतील नियोजनाची थांबलेली प्रक्रिया उरकून घेतली अन् आता कपात मागे घेतल्याचा आदेश धडकला आहे. त्यामुळे काही विभागांना फेरनियोजन करावे लागणार आहे. ज्यांनी नियोजनच केले नाही, अशांना मात्र आता वाढीव निधीसह नियोजन करणे शक्य होणार आहे. यात समाजकल्याणच्या दलित वस्ती सुधार योजनेचे नियोजन अजून अंतिम टप्प्यात असल्याने या नव्या बदलाचा फायदा उचलणे शक्य आहे.अनेक विभागांनी तर ही कपात होणारच नाही, अशा पद्धतीने आधीच तयारी चालविली होती. अशांना याचा फायदा होणार असून त्यांना तत्काळ नियोजन करून हा निधी खर्च करणे शक्य होणार आहे. मात्र ज्यांनी तशी तयारी केली नव्हती, अशांना जोमाने कामाला लागणे अगत्याचे आहे.जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी ९५.६७ कोटींची तरतूद मंजूर होती. ती कपातीनंतर ७७.८0 कोटींवर आली होती. १७.८७ कोटी कमी झाले होते. ते परत आले. आदिवासी उपयोजनेत २९.१५ कोटींपैकी जवळपास ९ कोटी तर विशेष घटकमध्ये ५0.४७ पैकी १५ कोटी कपात होती.ही सर्व जवळपास ४२ कोटी रुपयांची रक्कम आता पुन्हा नियोजनात आली आहे. १ फेब्रुवारीचे वित्त विभागाचे परिपत्रक विविध विभागांमध्ये धडकला आहे. यात विविध प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.निधी कपात मागे घेतल्यानंतर आता पूर्वी रद्द झालेली कामे घेण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अधिकाºयांना विचारणा होत आहे. तर काही विभागांचे अतिरिक्त निधीकडे लक्ष लागले आहे.