शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत ४० इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:10 IST

एखादी दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये, याची खबरदारी घेत हिंगोली नगरपालिकेतर्फे दरवर्षी शहरातील जीर्ण, धोकादाय इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित घरमालकांना नोटीस बजावली जाते. शहरात धोकादायक जवळपास ४० इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करून घ्याव्यात याबाबत पालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत नोटीस दिली जाणार आहे.

ठळक मुद्देघरमालकांना नोटीस : शहरातील जुन्या वस्त्यांमधील इमारतींचे पालिकेतर्फे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एखादी दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये, याची खबरदारी घेत हिंगोली नगरपालिकेतर्फे दरवर्षी शहरातील जीर्ण, धोकादाय इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधित घरमालकांना नोटीस बजावली जाते. शहरात धोकादायक जवळपास ४० इमारती असल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करून घ्याव्यात याबाबत पालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत नोटीस दिली जाणार आहे.हिंगोली नगर परिषदेअंतर्गत असलेल्या धोकादायक इमारतींचे नुकतच सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात ४० च्या आसपास जीर्ण इमारती असून त्या कधीही कोसळू शकतात. त्यामुळे अशा दुर्घटना टाळता याव्यात यासाठी पालिकेकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. धोकादायक असलेल्या इमारतींच्या मालकांना देखील दरवर्षी पालिकेतर्फे सुचविले जाते. मात्र नोटिसानंतरची कार्यवाही होताना मात्र दिसत नाही. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार हिंगोली शहरातील ज्या धोकादायक इमारती आहेत, त्या जास्त प्रमाणात जुन्या वस्त्यांमध्ये आहेत.नैसर्गिक आपत्तीमुळे इमारत कोसळून नाहक कोणाचा बळी जाऊ नये, किंवा इतर कुठलीही हानी होणार नाही, याची दक्षता घेत संबधित घरमालकांना धोकादायक इमारती खाली करण्यासंदर्भात लेखी सूचना दिल्या जाणार आहेत. सर्वेक्षणात आढळुन आलेल्या जीर्ण घरे व इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून लवकरच त्या खाली करण्याबाबत नगर पालिके तर्फे नोटीस दिल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल असे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.---ठोस कारवाई होईना...नगरपालिकेतर्फे दरवर्षी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबधितांना नोटीस बजावून इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु नियमानुसार नोटीस बजावल्यानंतर ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. मागील तीन ते चार वर्षांत हिंंगोली नगर पालिकेतर्फे अशी कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. आता सर्वेक्षणानुसार यादी तयार करून नोटीस दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यावर्षीच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघर