हिंगोली परिसरातील ५ जणांची रॅपिड ॲंटीजन टेस्ट घेण्यात आली होती. यापैकी एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र हिंगोली व कळमनुरी परिसरातील संशयितांची आरटीपीसीआर टेस्ट घेतली असता, हिंगोली परिसरातील ३ तर कळमनुरी परिसरातील १ एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमधील २ तर वसमत येथील कोरोना केअर सेंटरमधील १ रुग्णाची प्रकृती ठीक झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
आतापर्यंत एकूण ३ हजार ७४६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ हजार ६२५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.