कोरोनाचे नवे ४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:37+5:302021-07-22T04:19:37+5:30

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली ७, सेनगाव २६, औंढा ४५, वसमत २०, कळमनुरी २ जणांची तपासणी करूनही कोणी बाधित आढळले ...

4 new corona patients | कोरोनाचे नवे ४ रुग्ण

कोरोनाचे नवे ४ रुग्ण

Next

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली ७, सेनगाव २६, औंढा ४५, वसमत २०, कळमनुरी २ जणांची तपासणी करूनही कोणी बाधित आढळले नाही, तर आटीपीसीआर चाचणीत हिंगोली ६२, औंढा २३, तर वसमतला २७ पैकी एकही बाधित नाही. सेनगावात ४० पैकी कावरदरीत एक रुग्ण आढळला, तर कळमनुरीत १४० पैकी कळमनुरीत दोन व आखाडा बाळापूर येथे एक रुग्ण आढळून आला आहे.

आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ९७३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १५ हजार ५७४ जण बरे झाले. सध्या १३ जणांवर उपचार सुरू आहेत, तर आजपर्यंत ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दाखल असलेल्यांपैकी सहाजणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले असून, दोन अतिगंभीर बायपॅपवर आहेत.

Web Title: 4 new corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.