शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ट्रकमध्ये जनावरांची ३९.६ टन कातडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:28 IST

शहरालगतच्या गारमाळ परिसरातील बायपास मुख्य महामार्गावर पोलिसांना संशयास्पद ट्रक आढळून आला होता. हा ट्रक शनिवारी त्याब्यात घेऊन ठाण्यात उभा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरालगतच्या गारमाळ परिसरातील बायपास मुख्य महामार्गावर पोलिसांना संशयास्पद ट्रक आढळून आला होता. हा ट्रक शनिवारी त्याब्यात घेऊन ठाण्यात उभा केला. ट्रकमध्ये जनावरांचीच चामडी आहे का? हे पाहण्यासाठी पोलिसांनी ट्रकमधील एक तुकडा तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी ही कातडी जनावरांची असल्याचे निष्पन्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकमधून ३९.६ टन विविध जनावरांची कातडीची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरातील हायवेवर १ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करताना पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने नेमकी ट्रकमधून कशाची वाहतूक केली जात आहे, याची कसून चौकशी करण्यात आली. ट्रकसह चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. जनावरांची कातडी असावी, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे यातील एक तुकडा पशुवैद्यकीय डॉक्टराकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला. पशुवैद्यकीय डॉ. टाकळीकर यांनी ही कातडी गाय, बैल व इतर जनावरांची असल्याचे सांगितले. ट्रक क्रमांक आरजे-०९-जीसी-१०७० वाहन पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोना गजानन ढाले यांच्या फिर्यादीवरून आरोपी वसीम खाँ अब्दुल सलाम (रा. मागकडोन जि. उज्जैन मध्य प्रदेश) याच्याविरूद्ध महाराष्टÑ पशुसंवर्धन अधिनियम कायद्याअंतर्गत १ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि पांढरे करीत आहेत.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी