शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

३५०१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली:जिल्ह्यातील जे अल्पसंख्याक विद्यार्थी, प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरूनही अद्याप त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांना आता ...

ठळक मुद्देयोजना : अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली:जिल्ह्यातील जे अल्पसंख्याक विद्यार्थी, प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरूनही अद्याप त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांना आता शिष्यवृत्ती लाभाची संधी मिळणार आहे. मात्र संबंधित मुख्याध्यापकांनी अशा विद्यार्थ्यांची अचूक माहिती शाळा लॉगिनवरून सरल प्रणालीवर भरणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही लाभ मिळालाच नाही, असे जिल्ह्यात एकूण ३ हजार ५०१ विद्यार्थी आहेत.अल्पसंख्याक प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती सन २००९-१० ते २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांतील ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अद्याप शिष्यवृत्ती जमाच झाली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांची माहिती ते ज्या शाळेत शिकत आहेत तेथील मुख्याध्यापकांनी सरल प्रणालीवर आॅनलाईन भरण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिल्या आहेत. सदर विद्यार्थ्यांची यादी संबधित शाळांना ई-मेलद्वारे ३० डिसेंबर रोजी पाठविाली आहे. संचालक अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण महाराष्टÑ राज्य पुणे यांनी व्हीसीद्वारे दिलेल्या आदेशानुसार संबधितांना सूचना देऊन कळविण्यात आले आहे. शिष्यवृत्तीची अशाप्रकारे माहिती तत्काळ भरून दिल्यास जे अल्पसंख्याक विद्यार्थी वर्षानु-वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत, त्यांना लाभ मिळणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांची अचूक माहितीबाबत संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविल्याचे एम. ए. सय्यद यांनी सांगितले.हिंगोली:विद्यार्थ्यांची माहिती सरलप्रणालीवर\संबधित शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे बॅकखात्याची अचूक माहिती, बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड, आधारकार्ड व पालकांचा दूरध्वनी क्रमांक अशाप्रकारे अचून माहिती आॅनलाईन भरून सादर केल्यास विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांची माहिती सरलप्रणालीमध्ये शाळेच्या लॉग इनमध्ये तसेच संचालनालयाच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. संबधित शाळांनी त्यांच्या सरल लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून माहिती भरायची आहे, असे सांगण्यात आले.