शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत ३५० घरकुलांना मिळाली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:02 IST

शहरातील विविध भागातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी मध्ये जवळपा ७ हजार लाभार्थ्यांनी पालिकेकडे घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार त्यांचा सर्वे करुन अद्यापर्यंत ३५० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तर अजून ३५० घरकुलांचे प्रस्ताव तयार झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील विविध भागातून प्रधानमंत्री आवास योजना शहरी मध्ये जवळपा ७ हजार लाभार्थ्यांनी पालिकेकडे घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार त्यांचा सर्वे करुन अद्यापर्यंत ३५० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तर अजून ३५० घरकुलांचे प्रस्ताव तयार झाले आहेत.योजनेत संपूर्ण कागदपत्र लाभार्थ्यांनी आॅनलाईन दाखल केले आहेत. त्यानुसार संबंधित ठिकाणी जावून पालिकेच्या वतीने सर्वेक्षण केले. त्याची माहिती परत सॉप्टवेअरवर अद्ययावत केली. त्यामुळे अद्यापर्यंत ३५० घरकुलांना मंजुरी मिळाली असून, त्यांचे कामेही सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये २ लाख ५० हजार रुपये लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. तर अजून ३५० घरकुलांच्या प्रस्तावांना येत्या पंधरा दिवसांत मंजुरी मिळणार असल्याचे प्रकल्प अधिकारी भागवत शिंदे यांनी सांगितले. तसेच झोडपडी भागातीलही रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांचेही प्रस्ताव तयार करणे सुरु आहे. यामध्ये रिसाला बाजार, मस्तानशहानगर, सिद्धार्थनगर, पेंशनपुरा, बावन खोली, माहादेव वाडी या भागाचे सर्वेक्षण केले आहे. मात्र या भागात काही रहिवाशांकडे मालकी तर काही कडे मालकी नसल्याचेही समोर आले. त्यामुळे त्यांचे प्रस्ताव बनविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मंजुरी मिळालेली घरकुले एकाच वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही वरिष्ठांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.२०२२ पर्यंत ही योजना राबविण्यात येणार असल्याने अनेकांना या योजनेच्या लाभातून हक्काचे घरकुल मिळणार आहे. तर योजनेत अर्ज करण्याची पद्धतीही आॅनलाईन सोपी करण्यात आली आहे.शहरातील ज्या - ज्या लाभार्थ्यांची घरे मंजूर झाली आहेत. त्यांची कामे गतीने करुन घेतली जाणार आहेत. तर जे लाभार्थी शहरी ठिकाणी रहिवाशी आहेत मात्र त्यांना हक्काची जागाच नसल्याने अशा लाभार्थ्यांसाठीही घरकुल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्यावतीने जागेचा शोध घेतला जात आहे. यामध्ये शासकीय किंवा पालिकेच्या जागेवर घर बांधून दिले जाणार आहे. अनुदान वगळता उरर्वरित असलेली रक्कम संबंधित लाभार्थ्यांकडून घेण्यात येणार आहे. मंजूर झालेली घरे गतीने करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघर