शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामांवर ३२ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:49 IST

एकीकडे हाताला कामच मिळत नसल्याचा आरोप करून मजूर जिल्हा कचेरीसमोर उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात रोहयोच्या कामांवर ३२ हजार ४८0 मजूर उपस्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकीकडे हाताला कामच मिळत नसल्याचा आरोप करून मजूर जिल्हा कचेरीसमोर उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात रोहयोच्या कामांवर ३२ हजार ४८0 मजूर उपस्थिती आहे.हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजूर धरणे देत आहेत. त्यामुळे मागील सप्ताहातील मजूर उपस्थितीचा आढावा घेतला असता पंचायत समित्यांच्या ५४४ कामांवर तब्बल २५ हजार ४६0 तर यंत्रणांच्या १७६ कामांवर ७0२0 मजूर उपस्थिती असल्याचे अहवालात म्हटले आहे.यामध्ये पंचायत समित्यांचा विचार केल्यास हिंगोलीत १९५ कामांवर ८९५२, कळमनुरीत १६0 कामांवर ७४२५, सेनगावात ४७ कामांवर २२३३, वसमतला ३0 कामांवर १२२८ तर औंढा नागनाथ तालुक्यात ११२ कामांवर ५६२२ मजूर उपस्थिती होती. इतर यंत्रणांच्या कामांमध्ये हिंगोलीत १४ कामांवर ६२६, कळमनुरीत ५५ कामांवर २४१८, सेनगावात २९ कामांवर १३६४, वसमतला ६६ कामांवर ९३२ तर औंढ्यात १२ कामांवर १६८0 मजूर उपस्थिती आहे.एकीकडे कामे करण्याची मजुरांची तयारी वाढत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे कामे सुरू करण्यास मात्र टाळाटाळ होत असल्याचे दिसून येत आहे. हे विरोधाभासी चित्र टाळण्यासाठी प्रशासनाने संबंधित सर्व यंत्रणांना सक्त सूचना देण्याची गरज आहे. जिल्हा कचेरीसमोर मजूर धरणे देत असतानाही प्रशासनाची ढिम्न गतीच कायम राहात असल्यास ही गंभीर बाब आहे.