शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोत कुशलचे ३.0७ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:54 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये कुशल कामांवरील साहित्यावर झालेल्या खर्चाची रक्कम मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब आहे. हा आकडा वाढतच चालला असून आता ३.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता ही कामे करण्यासाठी उदासीनता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांमध्ये कुशल कामांवरील साहित्यावर झालेल्या खर्चाची रक्कम मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब आहे. हा आकडा वाढतच चालला असून आता ३.०७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता ही कामे करण्यासाठी उदासीनता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.हिंगोली जिल्ह्यात सध्या २१२ ग्रामपंचायतींमध्ये ८८१ कामे सुरू असल्याचे मग्रारोहयोतून सांगण्यात आले. यामध्ये औंढा तालुक्यात ५९ ग्रामपंचायतींत २७९, वसमत तालुक्यात २४ ग्रा.पं.त ९४, हिंगोली तालुक्यात ४० ग्रा.पं.त १७२, कळमनुरी तालुक्यात ६१ ग्रा.पं.त २३३, सेनगाव तालुक्यात २८ ग्रा.पं.त १०३ कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. या कामांवर औंढा-३८३८, वसमत-९८८, हिंगोली-२२२२, कळमनुरी-२५९६, सेनगाव-१२६६ अशी तालुकानिहाय मजूर उपस्थिती आहे. सुरू असलेल्या या कामांमध्ये बहुतांश कामे ही विहिरींची असल्याचे सांगण्यात येते. काही पंचायत समित्यांमध्ये नवीन कामे सुरू करण्यासाठी टाळाटाळ केली जात असली तरीही केवळ विहिरींच्या कामांमुळेच मजूरसंख्येत भर पडली आहे.या योजनेविषयी वाढत्या तक्रारींमुळे कामे होत नसून काही ठिकाणी तर नाहक तक्रारी करणाºयांचे टोळकेच निर्माण झाल्याचे दिसते. अशांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आल्यावर प्रशासनानेही त्यांचे मनोरंजन न केल्यास त्याला चाप बसू शकतो. शिवाय लोकप्रतिनिधींनीही नुसती कामे सुरू होण्याची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्या दर्जाकडे लक्ष दिल्यास ही वेळच येणार नाही.मग्रारोहयोत झालेल्या कामांची कुशलची रक्कम मात्र मागील ९ महिन्यांपासून मिळत नसल्याची बोंब सुरू आहे. यात ३.०७ कोटी रुपये थकले आहेत. यात औंढा-६६.७ लाख, वसमत-१८.०६ लाख, हिंगोली-३८.९८ लाख, कळमनुरी-९६.२७ लाख, सेनगाव-८७.३९ लाख अशी तालुकानिहाय रक्कम आहे. तर १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व तालुक्यांची मिळून ५४ लाखांची मजुरी मिळणे बाकी असून ३६ लाख कळमनुरीचे आहेत.