शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा २७ टन रेशनचा तांदूळ पकडला

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: July 1, 2023 21:13 IST

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी : ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रमुनी बलखंडे

हिंगोली : पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने काळ्या बाजारात २७ टन रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पकडला. ही कारवाई हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात १ जून रोजी पहाटे १:४५ वाजता केली. यात पोलिसांनी २७ टन रेशनच्या तांदळासह ट्रक असा एकूण ३० लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाला एका ट्रकमधून रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात नेला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलिस अंमलदार तुकाराम आम्ले, मोसिन पठाण, सुमित टाले, विनोद दळवी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे,आजम प्यारेवाले यांच्या पथकाने रिसाला बाजार येथे सापळा लावला. यावेळी अकोला बायपास भागाकडून नांदेड नाकाकडे एक ट्रक येत असल्याचे पथकाला दिसले. त्यांनी ट्रक थांबवून आतमध्ये पाहणी केलीअसता त्यात रेशनचा तांदूळ आढळून आला. चालकास या बाबत विचारणा केली असता अकोला बायपास भागातून ट्रकमध्ये माल भरला. हा माल कोठे घेऊन जायचा ते रौफभाई नावाचा व्यक्ती सांगणार होता, असे त्याने सांगितले. पोलिसांनी ५ लाख ४० हजार रूपये किमतीचा अंदाजे २७० क्विंटल असा २७ टन तांदूळ तसेच २५ लाख रूपये किमतीचा ट्रक असा एकूण ३० लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.  याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या फिर्यादीवरून चालक सुर्यकांत नागनाथ आप्पा स्वामी (रा. तुळशीरामनगर तरोडा नाका नांदेड) व हिंगोलीतील रौफभाई नावाच्या व्यक्तीवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले तपास करीत आहेत. 

तपासानंतर मुख्य सुत्रधार येणार समोर

रेशन धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी शासन रेशन धान्य वितरण प्रणालीत दिवसेंदिवस सुधारणा करीत आहे. ऑनलाईन प्रणालीही राबविली जात आहे. असे असताना मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर येत आहे. दरम्यान, यातील मुख्य सूत्रधार कोण आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली