शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२६ नवीन शिक्षकांना पदस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:59 IST

पवित्र पोर्टलवरून हिंगोली जिल्ह्यासाठी मिळालेल्या एकूण २४ शिक्षकांसह आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २ शिक्षकांना समुपदेशन पद्धत राबवून पदस्थापना देण्यात आली आहे. समुपदेशन केल्याच्या दिवशीच पदस्थापना दिल्याने शिक्षकांतून आनंद व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पवित्र पोर्टलवरून हिंगोली जिल्ह्यासाठी मिळालेल्या एकूण २४ शिक्षकांसह आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २ शिक्षकांना समुपदेशन पद्धत राबवून पदस्थापना देण्यात आली आहे. समुपदेशन केल्याच्या दिवशीच पदस्थापना दिल्याने शिक्षकांतून आनंद व्यक्त होत आहे.हिंगोली जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे अनेक शाळांतून शिक्षक मिळण्यासाठी ओरड होत होती. पालक शाळा बंद करण्याचा निर्णयही घेत असल्याचे अनेक ठिकाणी दिसत होते. आता संचमान्यतेनुसार पवित्र पोर्टलवर ३३ जागा भरण्याची मागणी शिक्षण विभागाने केले होते. यापैकी २८ जणांना नियुक्तीसाठी जि.प.कडे पाठविले होते. कागदपत्रे छाननीसाठी बोलावल्यानंतर २४ जणच हजर झाले होते. या २४ जणांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची प्रक्रिया अनंत चतुर्दशीच्या दिवशी सीईओ एच.पी.तुम्मोड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २ शिक्षकांनाही पदस्थापना दिली आहे. त्याचबरोबर संवर्ग ५ व ६ मध्ये जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये रॅण्डम राउंडमध्ये गेलेल्या शिक्षकांसाठीही समुपदेशन प्रक्रिया राबविली. अशा एकूण ३९ शिक्षकांना पदस्थापना दिली आहे. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया राबवून त्याच दिवशी या शिक्षकांच्या हाती पदस्थापनाही देण्यात आली. अवर सचिव त्रि.शं.कांबळे यांच्या पत्रानुसार ही प्रक्रिया राबविल्याचे सांगितले जाते. पवित्र पोर्टलवरून दाखल नवीन शिक्षकांत २२ शिक्षक सहावी ते आठवीला गणित व विज्ञान विषयासाठी उपलब्ध झाले आहेत. उर्वरित प्राथमिक शिक्षक आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक