शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सदस्यांना २५ रोजीची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:50 IST

विहित मुदतीत जात पडताळणी सादर न केल्याने कारवाईचे गंडांतर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना आता २५ आॅक्टोबरची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तत्काळ कारवाई होण्याची असलेली भीती यामुळे दूर झाली आहे. मात्र वेळेत पडताळणी दाखल करणे जिकीरीचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विहित मुदतीत जात पडताळणी सादर न केल्याने कारवाईचे गंडांतर असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांना आता २५ आॅक्टोबरची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तत्काळ कारवाई होण्याची असलेली भीती यामुळे दूर झाली आहे. मात्र वेळेत पडताळणी दाखल करणे जिकीरीचे आहे.आरक्षणाच्या जागा जवळपास ५0 टक्के आहेत. विविध प्रवर्गातून निवडून येणाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर अडचण नाही. नसल्यास मोठी कवायत करावी लागते. एकतर जातपडताळणी समित्यांना पूर्णवेळ अध्यक्षच मिळत नाहीत. सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडताळणीचे अर्ज प्रलंबित राहात आहेत. नातेवाईकाची जातपडताळणी झाल्यावरही अशांची संचिका जागीच पडून असते. त्यावरील धूळ झटकायलाही समितीला वेळ नसतो. त्यातच निवडणुकीच्या उमेदवारांच्या जातपडताळणीच्या हजारो संचिका उमेदवार निवडून आल्यानंतरही निकाली निघत नाहीत. जि.प.च्या ५२ पैकी २८ जण आरक्षणात निवडून आले. त्यापैकी १६ जणांचे प्रमाणपत्र वेळेत नव्हते. १२ जणांनी नंतर दाखल केले. अजून ४ बाकी आहेत. पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षित ५५ पैकी ३९ जणांनी दाखल केले नव्हते. नंतर १६ जणांनी दिले. आणखी २३ शिल्लक आहेत. ग्रामपंचायतच्या सदस्यांचा आकडा तर फार मोठा आहे. यामध्ये एकूण २३४३ जागा आरक्षणात होत्या. त्यापैकी २0६५ जणांकडे प्रमाणपत्र नव्हते. त्यानंतर २४१ जणांनी तर पुन्हा ६४२ जणांनी जात पडताळणी दाखल केली. अजूनही जवळपास १४२३ जण पडताळणी दाखल करायचे शिल्लक आहेत. याशिवाय सात ते आठ नगरसेवकही शिल्लक असल्याचा अंदाज आहे.अंतिम मुदत : शासन निर्णय जारीयाबाबत ११ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र जाहीर झाले आहे. त्यानुसार ग्रा.पं., जि.प., पं.स. अधिनियमात सुधारणा सुचविली आहे. त्यात जात पडताळणी दाखल न करणाºयांबाबत निर्णय दिलेला आहे. निवडणुकीनंतर वर्षभरापर्यंत जात पडताळणी दाखल करणा-यांना यामुळे आपोआपच दिलासा मिळाला आहे. मात्र आता यातील निकषपात्र सदस्यांना पडताळणी दाखल करण्यास राजपत्र प्रसिद्धी दिनांकापासून पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. ती २५ आॅक्टोबरला संपत आहे. त्यानंतरची पडताळणी ग्राह्य धरली जाणार नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीCaste certificateजात प्रमाणपत्र