शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी २.५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 18:49 IST

जिल्ह्यातील १२ आरोग्य केंद्रांना याचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देडीपीसीतून झाली निधीची तरतूद लवकरच सुरु होणार कामे

हिंगोली :  जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सौर उर्जा यंत्रणा उभारण्यासह परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जिल्ह्यातील १२ आरोग्य केंद्रांना याचा लाभ मिळणार आहे.

या योजनेत हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे सौर उर्जा संच १५ लाख तर पेव्हर ब्लॉक बसविणे १0 लाख, सिरसम आरोग्य केंद्रात सौर संच ७.५0 लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, वसमत तालुक्यातील हयातनगर आरोग्य केंद्र सौर संच ७.५0 लाख, टेंभूर्णी आरोग्य केंद्र सौरसंच १२ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, गिरगाव सौर उर्जा संच १५ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, कळमनुरी तालुक्यातील पोतरा आरोग्य केंद्र सौर संच १५ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, रामेश्वर तांडा आरोग्य केंद्र सौरसंच ७.५0 लाख, औंढा तालुक्यातील लोहरा आरोग्य केंद्र सौर संचास १५ लाख, सिद्धेश्वर आरोग्य केंद्र सौर संच १५ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख, सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी सौर संच १२ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाग, कवठा सौर संच १५ लाख, पेव्हर ब्लॉक १५ लाख, साखरा प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर संच १२ लाख, पेव्हर ब्लॉक १0 लाख असा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदाही झाल्या आहेत.

जिल्हा नियोजन समितीकडून या कामांसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीत नियोजनही झाले असून या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. या कामांमुळे आरोग्य केंद्रांचा परिसर स्वच्छ व नेटका राहण्यास मदत होणार असून वीज समस्येतून आरोग्य केंद्रांची मुक्तता होणार असल्याचे जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले. तर पुढील टप्प्यात उर्वरित कामे घेतल्यास जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आरोग्यसेवा बळकटीकरणाचे प्रयत्नदिवसेंदिवस आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी जि.प.कडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने रुग्णसेवेत अडचणी येतात. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.४जेथे रुग्णसंख्या जास्त आहे, अशा ठिकाणी या नव्याने होणाऱ्या सुविधांचा फायदा होणार आहे. यापूर्वी मुद्रांक शुल्क व मानव विकासच्या निधीतून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खाट, गाद्यांची व्यवस्था करण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी डॉक्टरांच्या नेमणुका आहेत. मात्र काही प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांत नेमलेले बीएएमस डॉक्टर हजर राहात नसल्याची बोंब होत असल्याने याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHingoliहिंगोली