शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात भगर खाल्ल्याने २४ भाविकांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

By रमेश वाबळे | Updated: March 8, 2024 13:41 IST

सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू; भाविकांची प्रकृती स्थिर

हिंगोली : विजया भागवत एकादशीच्या दिवशी भगर खाल्ल्याने सेनगाव तालुक्यातील खुडज येथील २४ भाविकांना विषबाधा झाली. यातील २० भाविकांना सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात तर एका भाविकास हिंगोली येथील खासगी रूग्णालयात ७ मार्च रोजी रात्री १०  वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

सेनगाव तालुक्यातील खुडज येथील भाविक दर पंधरवड्या एकादशीला नर्सी नामदेव येथे दिंडी घेऊन जातात. ७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे २० ते २५ भाविक खुडज येथून नर्सी येथे गेले होते. नामदेव महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते परत खुडजकडे निघाले. वाटेत हिंगोली- सेनगाव मार्गावरील गिलोरी फाटा येथे त्यांनी आपल्या सोबत नेलेली भगर व शेंगदाण्याची आमटी शिजवून खाल्ली. त्यानंतर सर्व भाविक गावाकडे परतले. परंतु, रात्री ८:३० वाजेच्या सुमारास काही भाविकांना मळमळ होऊन उलट्या होत होत्या. तर काहीचे डोके दुखत होते. त्रास वाढत असल्याने रात्री १०:३० वाजेच्या सुमारास २० भाविकांना सेनगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका महिलेला हिंगोलीच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

सध्या सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात रामचंद्र संभाजी साबळे (५५), वच्छलाबाई रामचंद्र साबळे (५०), सिताराम संभाजी साबळे (६५), लिलावती बळीराम धोटेकर (७०), सिताराम नामदेव झाटे (५७), अश्विनी गोपाळ टाले (२६), पुरूषोत्तम माणिकराव टाले (५५), लक्ष्मीबाई नारायण झाडे (४५), वर्षा विठ्ठल झाडे (४०), किसन तान्हाजी झाटे (६५), आश्रोबा नामाजी झाडे (६०), मंजूळाबाई कुंडलिक झाटे (५०), विठ्ठल बळीराम टाले (६०), छाया रमेश टाले (३५), राजेश त्र्यंबक टाले (४५), द्वारकाबाई बालकिशन झाडे (५५), रामेश्वर बालकिशन झाटे (४०), सविता रामेश्वर झाडे (३५), कमल दत्ता गिरी (४५), निवृत्ती विठोबा टाले (५९) यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर अन्नपूर्णाबाई गंगाराम टाले यांच्यावर हिंगोली येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व भाविकांची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfood poisoningअन्नातून विषबाधा