शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

२३८२ अपूर्ण कामे झाली आहेत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:05 IST

मग्रारोहयोत अपूर्ण कामांची वाढत चाललेली संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिलेल्या उद्दिष्टानुसार काम झाल्याने यात २३८२ अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. आता नव्याने १0७८ कामांचे उद्दिष्ट दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मग्रारोहयोत अपूर्ण कामांची वाढत चाललेली संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिलेल्या उद्दिष्टानुसार काम झाल्याने यात २३८२ अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. आता नव्याने १0७८ कामांचे उद्दिष्ट दिले आहे.जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रोहयोच्या कामांचा आज आढावा घेतला. मागील तीन महिन्यांत २३८२ अपूर्ण कामे पूर्ण केल्याने यंत्रणांचे कौतुक केले. मागील आठवडाभरात ७२ कामे झाली. यात कृषी १९, वन विभाग १५, ग्रा.पं.ची १८, लघुपाटबंधारे जि.प. १, सा.बां.-१, रेशीम विभागाची १४ कामे आहेत.अखर्चित निधीमुळे पुढील निधी मिळत नसल्याने यावर मात्र सर्वच बीडीओंनी २४ तासांत सुधारणा न केल्यास कारणे दाखवा देण्याचा इशारा दिला. यामध्ये ३१ लाख ४८ हजार जमा केले. मात्र त्याचे विवरण दिले नाही. तर २२.९0 लाख जमा करणे बाकी आहे. सिंचन विहिरींचा प्रश्न अजूनही लटकलेलाच आहे. ५६९५ विहिरींना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. तर ३४९0 विहिरींची कामे सुरू आहेत. २२0५ विहिरींची सर्व प्रक्रिया झालेली असल्याने ही कामे सुरू करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत केवळ ५७६ विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत. ही संख्या वाढण्यासाठी कामांना गती देण्याची सूचनाही त्यांनी दिली.मग्रारोहयोच्या कामांवरील मजुरांना वेळेत मजुरी मिळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न वाढविण्यास सांगितले. ८६.७७ टक्के मजुरी वेळेत मिळाली आहे. मात्र उर्वरित विलंबासाठी संबंधित अधिकारी कर्मचाºयांच्या पगारातून विलंब शुल्क वसूल करा. त्यासाठी कोषागारास पत्र देवून विलंब शुल्काशिवाय पगार करू नये, असे आदेशित करण्यासही सांगितले आहे.पालकमंत्री पाणंद योजनेला गतीहिंगोली जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद योजनेची कामे ठप्प होती. यासाठीचे दीड कोटी पडून होते. लोकमतमध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत १५0 कामांना मंजुरी दिली आहे. तर यात १५ लाखांचा खर्च झाला आहे. तर १0 कामे पूर्ण झाली आहेत. ३२ कामे सुरू झाली आहेत. यात औंढा १0, वसमत ३, हिंगोली २, कळमनुरी १२ व सेनगावात ५ कामे सुरू झाली आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीcollectorजिल्हाधिकारी