शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

१० हजारांच्या अनुदानावर मिळणार २३३ पंपसंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:50 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्टÑीय गळितधान्य व तेलताड अभियानांतर्गत सन २०१८- १९ साठी १० हजार रुपयांच्या अनुदानावर योजनेच्या निकषपात्र शेतकऱ्यांना २३३ पंपसच मिळणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाच्या वतीने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्टÑीय गळितधान्य व तेलताड अभियानांतर्गत सन २०१८- १९ साठी १० हजार रुपयांच्या अनुदानावर योजनेच्या निकषपात्र शेतकऱ्यांना २३३ पंपसच मिळणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाच्या वतीने केले आहे.हिंगोली जिल्ह्यासाठी फ्लेक्झी निधी बाबीअंतर्गत उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामध्ये १० हजारांपर्यंत अनुदानावर १६ तुषार संच २३३ कृषीपंप संच वितरित केले जाणार आहेत. तर एफ.पी.ओ.साठी गोदाम बांधकाम करण्यास बँक कर्ज मंजूर झाल्यास १२.५0 लाखांपर्यंत अनुदान देता येणार आहे. हे दोन प्रस्ताव मंजूर करता येतील. याच धर्तीवर एफ.पी.ओ.साठी बिजप्रक्रिया संयंत्र एका प्रस्तावाचे उद्दिष्ट असून १0 लाखांपर्यंत अनुदान आहे. सन २०१८- १९ मध्ये राष्टÑीय गळीतधान्य व तेलताड अभियानांतर्गत ४० ते ५० रुपये प्रतिमीटर पाईपच्या खर्चाच्या ५० टक्के मर्यादेत ४९ हजार २०० मीटर पाईप, तर साडेबारा लाख बँक कर्जाशी निगडीत ३४. ७७ लक्ष फ्लेक्सी निधी अंतर्गत एफ. पी.ओेसाठी गोदाम बांधकाम, २० बाय २० बाय ३ आणि ३० बाय ३० बाय ३ शेततळे यात निकषाप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. इच्छुकांनी ३० जुलैपर्यंत विहित प्रपत्रामध्ये अर्ज संबंधित कृषी सहायक अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे.बँकेकडे प्रस्ताव दाखल करावा४गोदाम बांधकाम व बिजप्रक्रिया सयंत्र ही बाब बँक कर्जाशी निगडीत असल्याने, इच्छुक शेतकरी उत्पादक संघ,कंपनी, एफ. पी. ओ, एफ. पी. ओ यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनानुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी