शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१९४१२ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:54 IST

जिल्हा आरोग्य विभागातर्फे मागील तीन वर्षांत १९४१२ कुटुंबनियोजन शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये पुरूषनसबंदीला अल्प प्रतिसाद मिळत आहेत. मागील तीन वर्षात केवळ १७२ पुरूषांनी नसबंदी करून घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा आरोग्य विभागातर्फे मागील तीन वर्षांत १९४१२ कुटुंबनियोजन शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये पुरूषनसबंदीला अल्प प्रतिसाद मिळत आहेत. मागील तीन वर्षात केवळ १७२ पुरूषांनी नसबंदी करून घेतली आहे.कुटुंब नियोजनासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ असा नारा देत कुटुंबनियोजनाचे महत्त्व समाजामध्ये बिंबवले जात आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये मात्र पुरष नसबंदीचे अल्प प्रमाण आहे. त्यामुळे कुटुंबनियोजनाची जबाबदारी महिलांनीच घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्हा आरोग्य विभागाला कुटुंबनियोजनासाठी ७ हजार ६६८ उदिष्ट दिले होते, त्यापैकी ६ हजार ७८६ कुटुंबनियोजनच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यामध्ये ५७ पुरूषांनी नसबंदी केली आहे. तसेच २०१६-१७ या वर्षात ८ हजार ५०७ उदिष्ट होते. त्यापैकी ६ हजार ७८१ जणांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतली, यात सर्वाधिक ९२ पुरूषांनी नसबंदी करून घेतली. तर सन २०१७-१७८ या वर्षात आरोग्य खात्याला ८ हजार ५०७ कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे उदिष्टापैकी ५ हजार ८४५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये अत्यल्प म्हणजे केवळ २२ पुरूषांचा सामावेश आहे. तर चालू आर्थिक वर्षाची आकडेवारी जुळवणी आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.आतापर्यंत ४४३ जणांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतली असून एकही पुरूष नसबंदी केसची नोंद आरोग्य विभागात दिसून आली नाही. त्यामुळे कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांनीच घेतली आहे, असे वरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शिवाय जनजागृतीचाही हवा तसा परिणाम दिसून येत नाही. शहरासह ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेने मोहिम राबवून जनजागृती करणे गरजेचे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य