शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यापासून १८ टन खत निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:16 IST

रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणारा कचरा पालिकेच्या घंटागाडीमुळे कमी झाला असून, दिवसाकाठी शहरातून ९० टन कचरा पालिकेतर्फे उचलून शहरा बाहेर टाकला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणारा कचरा पालिकेच्या घंटागाडीमुळे कमी झाला असून, दिवसाकाठी शहरातून ९० टन कचरा पालिकेतर्फे उचलून शहरा बाहेर टाकला जात आहे. तर ओला व सुका कचºयावर प्रक्रिया करुन जवळपास १८ टन सेंद्रीय खत निर्मित्तीही करण्यात आलेली आहे.हिंगोली शहराने विकासाच्या बाबतीत कात टाकली आहे. पूर्वी कचºयाने माखलेले रस्ते आता पूर्वी सारखे दिसत नाहीत. एवढेच काय तर नागरिकही स्वच्छतेचे काही देणे घेणे नसल्यागत वागत होते. यातून शहराचे सौंदर्य पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर होते. मात्र पालिकेने शहरातील स्वच्छतेकडे लक्ष घातल्याने शहराला सौंदर्य प्राप्त झाले आहे. चार महिन्यांपुर्वी शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारीच एका कंत्राटदाराला दिल्याने, दिवसाकाठी ८४ ते ९० टन कचरा ३२ वाहनाद्वारे शहराबाहेर उचलून नेला जात आहे. आता प्रत्येक नगरातील नागरिकांनाही घंटा गाडीची सवय होऊन बसली आहे. घंटागाडी आली की आपसुकच कचºयाकडे नागरिकांचे लक्ष जात आहे. चार महिन्यात अद्यापर्यंत ३६ हजार ६०० टन कचरा शहरातून बाहेर टाकण्यात आला आहे. त्यातच पालिकेतर्फे शहरात जागो- जागी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्यातही कचरा टाकला जातो. मात्र त्या कचरा कुंड्या वेळीच रिकाम्या केल्या जात नसल्याने रस्त्यावर कचरा सांडत असल्याचे चित्र दिसून येते.शहरातील विविध नगरातील कचरा घंटागाडीद्वारे उचलला जात असला तरी यातील बºया पैकी कचरा गाड्या ढकलस्टार्ट झालेल्या आहेत. तसेच काही वाहनांच्या तर फालक्यातून कचराही रस्त्यावर गळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कचरा उचलणाºया वाहनांची दुरुस्तीकी करणे तेव्हढेचगरजेचे आहे. तसेच ढकलस्टार वाहने असल्याने कोठेही बंद पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध नगरातील नागरिकांना धक्का देऊन वाहने सुरु करण्यास मदत करावी लागत आहे. गाडीची सवय झालेली असल्याने तीची दुरुस्तीही करणे गरजेचे आहे.शहरातून उचलण्यात येणाºया कचºयावर प्रक्रिया करुन शेंद्रीय खत निर्मित्ती करणे सुरु आहे. यंदा शेतकºयांसाठी हे खत विक्रीस उपलब्ध केले जाणार असल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक