शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

१५८६ ग्राहकांची वीज केली खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:59 IST

सातत्याने वाढत जाणाऱ्या वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून मागील २५ दिवसांत हिंगोली जिल्हयातील सर्वच वर्गवारीतील १५८६ थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सातत्याने वाढत जाणाऱ्या वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून मागील २५ दिवसांत हिंगोली जिल्हयातील सर्वच वर्गवारीतील १५८६ थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या मोहिमेत ३ कोटी ४२ लाख रुपयांची वसूली करण्यात आली. धडक मोहिमेमुळे मात्र थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.वीज बिलांच्या थकबाकीमुळे महावितरणला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या हिंगोली मंडळाने थकबाकी वसुलीसाठी तीव्र मोहिम राबविण्यास सुरवात केली आहे. हिंगोली जिल्हयामध्ये कृषीपंप ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील २८५७ वीजग्राहकांकडे १५ कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील २५७५ वीजग्राहकांकडे ३ कोटी २० लक्ष रुपयांची थकबाकी आहे. पथदिव्यांच्या 16 वीजग्राहकांकडे २ कोटी २१ लक्ष तसेच २३८ पाणीपुरवठा योजनांकडे ९ कोटी ९७ लक्ष रुपये थकबाकी आहे. १ डिसेंबरपासून सुरु केलेल्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईमध्ये मागील २६ दिवसांत ११५७ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरुपात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तर ४२९ वीजग्राहकांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदर मोहिमेत २ हजार ३४८ वीजग्राहकांकडुन ३ कोटी ४२ लाखांची वसुली करण्यात आली आहे. पुढील काळात ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी आपल्या थकबाकीसह चालू महिन्याचे वीज देयक त्वरीत भरून घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात महावितरणकडून थकित वीजबिल धडक वसुली मोहीम सुरू आहे.वीजबिल भरण्यासाठी महावितरणच्या वीजदेयक भरणा केंद्र सोबतच मोबाईल अ‍ॅप, इंटरनेट बँकींगव्दारे, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, पेटीएम आदी सुविधा चोवीस तास उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजबिलाचा त्वरीत भरणा करावा व वीज पुरवठा खंडीत करण्याचे टाळावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हाभरात वसूली पथकाद्वारे थकीत विजबिल ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे महावितरणच्या वीजदेयक भरणा केंद्रात भरून घेण्याचे आवाहन केले.ग्राहकांकडे वीजबिले थकल्यामुळे महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकीत बिलभरणा करावा असे आवाहन महावितरणकडून केले आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण