शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१३४४ उमेदवारांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:59 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ‘क’ पूर्व परीक्षा १० जून रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत हिंगोली शहरातील ७ उपकेंद्रावर घेण्यात आली. एकूण १ हजार ७२२ उमेदवारांपैकी १३४४ जणांनी परीक्षा दिली. तर ३७७ उमेदवार परीक्षेस गैरहजर होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ‘क’ पूर्व परीक्षा १० जून रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत हिंगोली शहरातील ७ उपकेंद्रावर घेण्यात आली. एकूण १ हजार ७२२ उमेदवारांपैकी १३४४ जणांनी परीक्षा दिली. तर ३७७ उमेदवार परीक्षेस गैरहजर होते.हिंगोली शहरातील सात उपकेंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. यावेळी पोलीस बंदोबस्त होता. शहरातील आदर्श महाविद्यालय भाग ‘अ’ परीक्षा केंद्रावरून ३३६ पैकी २५२ जणांनी परीक्षा दिली. तर ८४ उमेदवार परीक्षेस गैरहजर राहिले. तसेच आदर्श महाविद्यालय भाग ‘ब’ केंद्रावरून ३३६ पैकी २६३ उपस्थित तर ७३ गैरहजर राहिले. सिक्रेटहार्ट इंग्लिश स्कूल केंद्रावरून २४० पैकी १९१ जणांनी परीक्षा दिली. तर ४९ गैरहजर होते. जिल्हा परिषद बहुविध प्रशाला केंद्र १९२ पैकी १५३ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३९ गैरहजर होते. शिवाजी महाविद्यालय केंद्रावरून १९२ पैकी १५४ उपस्थित तर ३८ जण गैरहजर होते.जिल्हा परिषद कन्या शाळा केंद्रावरून १६८ पैकी १३४ जणांनी परीक्षा दिली. तर ३४ गैरहजर राहिले. सरजूदेवी भिकूलाल भारूका आर्य कन्या विद्यालय परीक्षा केंद्रावरून २५७ पैकी १९७ परीक्षार्थीनीं परीक्षा दिली. ६० जण गैरहजर होते. महाराष्टÑ लोकसेवा अयोग तर्फे गट ‘क’ पुर्व परीक्षेस एकूण १७२१ पैकी १३४४ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३७७ उमेदवार सदर परीक्षेस अनुपस्थित होते.परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, कॅल्क्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर मायक्रोफोन, मोबाईल फोन कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सीमकार्ड, दूरसंचार साधने म्हणून वापरण्या योग्य कोणतीही वस्तू, बॅग्ज अथवा शासनाने बंदी घातलेल्या इतर कोणत्याही साहित्यासह केंद्राच्या परिसरात कक्षात आणण्यास किंवा स्वत:जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले होते.हिंगोली जिल्ह्यातील सातही केंद्रावरून परीक्षा सुरळीत पार पडली. सदर परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पहिले प्रशिक्षण ६ जून रोजी घेण्यात आले. सदर प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Hingoliहिंगोलीexamपरीक्षा