शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १२ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:54 IST

दरवर्षी शासनाकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी वाटपाच्या सूचना आहेत. तालुका स्तरावरून जिल्हा कार्यालयाकडे १२ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षी शासनाकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नियमप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी वाटपाच्या सूचना आहेत. तालुका स्तरावरून जिल्हा कार्यालयाकडे १२ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.राज्य शासनाकडून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने पुरस्कार वितरित करून शिक्षकांचा सन्मान केला जातो. हिंगोली जिल्ह्यातील तालुका स्तरावरून संबधित गटशिक्षणाधिकाºयांनी जिल्हा कार्यालयात एकूण १२ शिक्षकांचे प्रस्ताव दाखल केले आहेत. निवड समितीमार्फत सदर प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार आहेत. मान्यता मिळताच संबधित शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदर्श पिढी घडविणाºया शिक्षकांचा शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. शासनाच्या तशा सूचनाही आहेत. परंतु वेळेत पुरस्कार प्राप्त होत नाहीत. त्यामुळे पुढील प्रक्रिया रेंगाळते. दरवर्षी ही अशीच बोंब आहे. शिक्षणाधिकाºयांकडून संबधित तालुक्याच्या गशिअंंना वेळोवेळी याबाबत लेखी सूचना दिल्या जातात. मात्र प्रस्ताव दाखलास विलंब होतो. परिणामी, ५ सप्टेंबरऐवजी अन्य दिवशीच हे पुरस्कार वितरित करण्यात येतात. गतवर्षी जिल्ह्यातील ६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.शिक्षक दिन अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही शिक्षण विभागाकडून अद्याप प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले नाहीत हे विशेष. संबधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांना आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुक्यातील शिक्षकांचे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. २४ आॅगस्ट प्रस्ताव दाखल करण्याची शेवटची तारीख होती.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक