शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिका ठरली ३५२० रुग्णांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 11:03 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे.

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे.

मागील दोन वर्षांपासून रस्त्यावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अवघ्या दोन वर्षांत तब्बल रस्त्यावरील अपघातात २६० जणांचा बळी गेलेला असला तरीही जखमींची संख्या सर्वाधिक जास्त आहे. केवळ वेळेवर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्यामुळे अनेक रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले आहेत. तर अनेक गोरगरीब रुग्णांना हिंगोली येथून नांदेडसह इतर रुग्णालयात रुग्णांना हलविण्यासाठीही ही रुग्णवाहिका अतिशय उपयेगाची ठरली आहे. विशेष करुन १०२ जननी शिशुच्या रुग्णवाहिकेला उतरती कळा आल्याने याच रुग्णवाहिकेवर गरोदरमांताची ने-आण करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेही रुग्ण समाधानी आहेत.

मात्र एखाद्यावेळी गरोदर मातेला आणण्यासाठी तर कधी प्रसुती मातांना नेऊन सोडण्यासाठी रुग्णवाहिका गेल्यास, अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे १०२ रुग्णवाहिकेचा ताण कमी करुन केवळ अपघातस्थळी जाण्यासाठीच या रुग्णवाहिकेचा वापर केल्यास खरोखरच अनेक रुग्णांना ही रुग्णवाहिका संजीवनी ठरणार आहे. सध्या दोन्हीकडेही रुग्णवाहिका धावत असल्याचे चित्र आहे. तर हिंगोलीतील यंत्राणाही रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याबाबत यंत्रणेला कडक सूचविले आहे. तर अनेकदा याबाबत तक्रार आल्यास स्वत: दखल घेवून संबंधितांना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे कामाचा ताणजिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या १२ रूग्णवाहिका आहेत. प्रत्येक रूग्णवाहिकेत नियमाप्रमाणे तीन डॉक्टर असणे आवश्यक आहेत. परंतु १२ रूग्णवाहिकेवर केवळ २८ डॉक्टरच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रूग्णांची गैरसोय होऊ नये, वेळेत कॉल पूर्ण करता यावा यासाठी डॉक्टरांकडून नियोजन केले जाते. परंतु त्यामुळे मात्र अतिरिक्त कामाचा ताण येतो. लवकरच तीन डॉक्टरांची पदे भरली जाणार आहेत, असे जिल्हा व्यवस्थापक डॉ. ईनायतुल्ला खान यांनी सांगितले. तर १०२ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वाहने दुरूस्तीस पाठविली आहेत. तर ६ रूग्णवाहिका वापराविना धूळ खात पडून आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधंgovernment schemeसरकारी योजना