शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

जलयुक्त शिवारचे १0.७१ कोटी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:15 IST

जलयुक्त शिवार योजनेतील सुरू असलेल्या कामांची संख्या भरमसाठ असली तरीही ती पूर्ण होत नसल्याने निधी खर्चाचे प्रमाणही कमी आहे. कृषी विभागाला या योजनेसाठी १0.७१ कोटी मिळाले आहेत. मात्र विविध यंत्रणांकडून मागणीच येत नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील सुरू असलेल्या कामांची संख्या भरमसाठ असली तरीही ती पूर्ण होत नसल्याने निधी खर्चाचे प्रमाणही कमी आहे. कृषी विभागाला या योजनेसाठी १0.७१ कोटी मिळाले आहेत. मात्र विविध यंत्रणांकडून मागणीच येत नसल्याचे चित्र आहे.जलयुक्त शिवार योजनेत कृषीच्या मंजूर १४९५ पैकी १३२५ कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पूर्ण झालेली कामे मात्र ८१५ आहेत. उर्वरित कामे पूर्ण होणे बाकी आहे. लघुसिंचन जलसंधारण विभागाच्या ४२६ कामांची निविदा प्रक्रिया झाली आहे. मात्र पूर्ण झालेली कामे २११ आहेत. लघुसिंचन जि.प.च्याही ९५ कामांची निविदा प्रक्रिया झालेली आहे. तर पूर्ण झालेली ४८ कामे आहेत. वन विभागाच्या निविदा झालेल्या ५६ कामांपैकी २५ पूर्ण झालेली आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा जि.प.च्या १९५ कामांची निविदा प्रक्रिया झाली तरीही एकही पूर्ण नाही. भूजल सर्वेक्षणच्या १३५ कामांची निविदा प्रक्रिया झाली असून आतापर्यंत ४२ पूर्ण झाली आहेत.या विभागांनी कामे केली तरीही कृषी विभागाने २.६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. उर्वरित विभागांनी अजून खर्चच दाखविला नाही. तर कृषी विभागाकडे जलयुक्तसाठी निधी आला असतानाही त्याची मागणी केली जात नाही. विशेष म्हणजे आचारसंहितेपूर्वी ही मागणी केल्यास कामांच्या तुलनेत निधी वितरित करणे सोपे होते. मात्र आता पूर्ण झालेल्या कामांनाच निधी देता येणार आहे. त्यामुळे आता येनकेनप्रकारे ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या कामांचाही खर्चच दाखविला नसल्याचेही दिसत आहे.जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात कामे मंजूर आहेत. मात्र आतापर्यंतही या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र कायम आहे. मंजूर झालेली व सुरू असलेली ही कामे असल्याने या कामांना गती देणे आवश्यक आहे. यंदा आधीच दुष्काळी परिस्थिती आहे. त्यात पुढील वर्षी तरी या कामांचा फायदा संबंधित गावांना होणार आहे. यंदा तब्बल ११५ गावे जलयुक्त शिवारच्या यादीत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील गावांत कामांचे नियोजन व देखरेख सोपी नाही. त्यातही निवडणुकीचे वर्ष असल्याने यंत्रणा त्यातही अडकून पडणार आहे.जलयुक्त शिवार योजनेतील कामे करण्यास काही यंत्रणा तेवढ्या सजग आहेत. उर्वरित यंत्रणांना ही कामे नकोशी वाटतात. त्यामुळे जलयुक्त शिवारची कामे रखडण्याची दरवर्षीचीच बोंब कायम आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीfundsनिधी