जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने १०३ रुग्ण आढळले; १४९ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:29 AM2021-05-14T04:29:31+5:302021-05-14T04:29:31+5:30

हिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे नव्याने १०३ रुग्ण आढळले. यात २१ रुग्ण रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये तर ८२ रुग्ण आरपीटीसीआर ...

103 new cases of corona were found in the district; 149 Bare | जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने १०३ रुग्ण आढळले; १४९ बरे

जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने १०३ रुग्ण आढळले; १४९ बरे

Next

हिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे नव्याने १०३ रुग्ण आढळले. यात २१ रुग्ण रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये तर ८२ रुग्ण आरपीटीसीआर टेस्टमध्ये आढळून आले. तसेच दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून १४९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात १३ मे रोजी २११ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये हिंगोली परिसरात ४५ पैकी ६ रुग्ण आढळले. यात सिद्धिविनायक सोसायटी १, बावणखोली १, गायत्री मंदिर १, बळसोंड २, खुडज २ यांचा समावेश आहे. वसमत परिसरात ४३ पैकी २ रुग्ण आढळले असून यात जयनगर १, गिरगाव १ यांचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात ४३ पैकी ४ रुग्ण आढळले असून घोडा १, कळमनुरी १, पेठवडगाव १, मरडगा येथील एका रुग्णाचा समावेश आहे, सेनगाव परिसरात ५९ पैकी ७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सेनगाव ४, नागासिंगी १, आजेगाव १, डोंदरदरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. औंढा परिसरात २१ पैकी औंढा येथे २ रुग्ण आढळले आहेत. आरटीपीसीआर टेस्टमध्ये हिंगोली परिसरात ४० रुग्ण आढळले असून यात असोला १, इंदिरानगर १, नागझरी १, सावरखेडा १, हत्तातांडा १, भेटसावंगी १, अंधारवाडी १, कारवाडी १, माळधामणी एक, एनटीसी २, हनुमान गल्ली १, सुराणानगर १, शिक्षक कॉलनी १, पेन्शनपुरा १, पंढरपूरनगर १, हिंगोली १, नाईकनगर १, हनुमाननगर ३, नारायणनगर १, पुसेगाव १, येहळेगाव सोळंके १, फाळेगाव १, बियाणीनगर १, हिंगोली १, मारवाडी गल्ली १, सोनवाडी १, डिग्रस २, आनंदनगर १, जडगाव १, राहोली खुर्द १, विकासनगर कळमनुरी १, पहेनी १, तोफखाना एक, चिंचखेडा, सेनगाव १, पोस्ट ऑफिस रोड हिंगोली १, पांगरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. औंढा परिसरात १५ रुग्ण आढळले असून यात गोळेगाव २, नांदेडा १, टाकळखोपा १, औंढा १, पाझरतांडा १, वाळकी २, बाराशिव २, शिरड २, पिंपळदरी १, उखळी १, सिरला १ यांचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात १३ रुग्ण आढळले असून यात मसोड येथील २, उमरदरा १, डिग्रस १, सेनोडी ४, डोंगरकडा २, वारंगा फाटा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

वसमत परिसरात स्वानंद कॉलनी १, रविवारपेठ येथे १ असे दोन रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात १२ रुग्ण आढळले असून यात लिंबाळा तांडा ५, पळसी १, उटी १, उमरदरी १, जयपूर १, हत्ता १, लिंबाळातांडा येथे २ रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, गुरुवारी १४९ रुग्ण बरे झाले आहेत. यात जिल्हा रुग्णालयातील ४१, लिंबाळा १५, वसमत १, कळमनुरी २५, औंढा ३७ तर सेनगाव येथील कोरोना केअर सेंटरमधील २३ बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ हजार ६१२ रुग्ण आढळले असून यापैकी १३ हजार ५५७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ७५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ३२४ रुग्ण गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर ३० रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

आतापर्यंत ३०० रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात गुरुवारी २ रुग्णांचा मृत्यू झाला. यात हिंगोली आयसोलेशन वॉर्डातील कहाकर, सेनगाव येथील साठ वर्षीय महिला व माउलीनगर हिंगोली येथील सत्तर वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत तीनशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 103 new cases of corona were found in the district; 149 Bare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.