शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
3
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
4
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
5
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो समोर आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
6
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
7
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
8
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
9
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
10
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
11
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
12
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
13
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
14
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
15
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
16
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
17
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
18
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
19
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
20
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

विचित्र अपघातात १ ठार

By admin | Updated: February 13, 2015 15:17 IST

औंढा /नागनाथ ते जवळाबाजार रस्त्यावर वगरवाडी शिवारात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता एक पिकअप, २ ट्रक व एक पियाजो ऑटो यांच्यात अपघात झाला.

 

जवळा बाजार : /औंढा /नागनाथ ते जवळाबाजार रस्त्यावर वगरवाडी शिवारात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता एक पिकअप, २ ट्रक व एक पियाजो ऑटो यांच्यात अपघात झाला. यात ऑटोमधील एकजण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.  औंढा नागनाथ ते जवळा बाजार रस्त्यावर वगरवाडी शिवारात जिंतूर फाट्याजवळ सकाळी ९ वाजता नांदेडकडून ट्रक क्र. एपी- १६ टीडब्ल्यू ८१७९ हा मिरची घेवून जात होता. तर त्यांच्या पाठीमागून एमएच २६- ७७२४ ट्रक जात होता. याचवेळी औंढय़ाकडून शिरडशहापूरकडे पियाजो ऑटो एमएच २२ एन- ३१८३ हा प्रवासी घेवून जात असताना पाठीमागून पिकअप क्र. एमएच २६, एडी ८७६७ हा भरधाव वेगाने आला. या पिकअपने प्रथम एपी-१६ टीडब्ल्यू १८७९ ला समोरून धडक देवून दुसर्‍या ट्रकवर तो आदळला. त्यानंतर पुढे असलेल्या ऑटोवर जावून पडला. यात ऑटोमधील नामदेव लोडबा मोरे (४८ रा.जिजामाता नगर हिंगोली) या छायाचित्रकाराचा जागीच मृत्यू झाला. नामदेव महादू खोकले (२५ रा. जलालधाबा), शेख उस्मान शेख गुलाब (२८ रा. पेडगाव ता. हिंगोली), शेषेकलाबाई महादू खोकले (४0 रा. जलालधाबा), शबाना शेख उस्मान (४0, पेडगाव), शोभा शिवाजी धनवे (२२, रा.वाळकी), स्वप्नील मंचक बेले (१६ रा.रामवाडी ता.कळमनुरी) हे गंभीर जखमी झाले.औंढा येथे ग्रामीण रुग्णालयात डॉ.सतीश वाकळे, डॉ.ढेंबरे, जयo्री फत्तेपुरे, पुष्पा कांबळे, भुजंग हनवते यांनी त्यांच्यावर प्रथमोचार केले. याबाबतची फिर्याद मुंजाजी अंभोरे (रा.वगरवाडी) यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच औंढा ठाण्याचे पोनि लक्ष्मण केंद्रे, पोना भिमराव चिंतारे तसेच जवळाबाजार पोलिस चौकीचे जमादार शे. खुद्दूस, इम्रान सिद्दीकी, प्रभाकर भोंग, बेटकर यांनी घटनास्थळी जावून जखमींना दवाखान्यात नेले. घटनास्थळावरून पिकअप चालक फरार झाला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. /(वार्ताहर)