शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

त्या अधिकाऱ्यांना सावधानतेचा इशारा; अन्यथा करणार क्वारंटाईन -जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 11:43 IST

कोल्हापूरमधील काही शासकीय अधिकारी हे कामाचा बहाणा करून शनिवारी आणि रविवारी जिल्ह्याबाहेर म्हणजेच मुंबई, पुणे, सातारा याठिकाणी जात असल्याचे निदर्शनास आले आहे; असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-याने असा कामाचा बहाणा करून

ठळक मुद्देकामाच्या बहाण्याने जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करणारजिल्हाधिकारी दौलत देसाई; लॉकडाऊनमधील निर्बंध कायम राहणार

कोल्हापूर : कामाचा बहाणा करून सीमाबंदीचे उल्लंघन आणि कोल्हापूर जिल्ह्याबाहेर जर कोणी शासकीय अधिकारी गेल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिला. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमधील निर्बंध दि. २० एप्रिलनंतरही कायम राहतील. त्याबाबत राज्य सरकारच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरमधील काही शासकीय अधिकारी हे कामाचा बहाणा करून शनिवारी आणि रविवारी जिल्ह्याबाहेर म्हणजेच मुंबई, पुणे, सातारा याठिकाणी जात असल्याचे निदर्शनास आले आहे; असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-याने असा कामाचा बहाणा करून सीमाबंदीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना संस्थात्मक अलगीकरण केले जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. कोरोनाबाबत कोल्हापूर जिल्ह्याचा ‘हॉटस्पॉट क्लस्टर’मध्ये समावेश झाला आहे. कोरोना प्रादुर्भावाची जिल्ह्यातील स्थिती लक्षात घेता दि. २० एप्रिलनंतरही लॉकडाऊनमधील निर्बंध सध्या जसे आहेत, तसेच राहणार आहेत. त्याबाबत राज्य सरकारच्या आदेश, सूचनेनुसार कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.पीपीई किटस् पुरेशीपुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्यास जिल्ह्याच्या हद्दीमध्ये कोरोनाबाबतची तपासणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संस्थात्मक अलगीकरणासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शाळा, महाविद्यालयांची वसतिगृहे, काही इमारती ताब्यात घेतल्या आहेत. त्याठिकाणी एकूण सुमारे १० हजार जणांची व्यवस्था करता येईल. जिल्ह्यात पीपीई किटस् पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याची कमतरता नाही. सध्या चार हजार पीपीई किटस् उपलब्ध आहेत. एक दिवसआड पाचशे किटस् जिल्हा प्रशासनाला मिळत असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारी