शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं वजन जागेपणी नाही, झोपेत वाढतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 17:41 IST

आपल्या कॅलरीजही जळतात, त्या जागेपणी नव्हे, झोपेत!

ठळक मुद्देसंपूर्ण दिवसभरात आपल्या जेवढ्या कॅलरीज जळतात, त्यातल्या सुमारे ६० ते ६५ टक्के कॅलरीज ज्यावेळी आपण झोपेत असतो, त्यावेळी जळतात!जागेपणी मात्र आपल्या ३५ ते ४० टक्के कॅलरीजच फक्त जळतात.झोप आणि वजन यांचं ‘मैत्र’ आहे ते असं!

- मयूर पठाडेआपल्याला वाटतं, अपुºया झोपेमुळे आपल्या आरोग्यावर असा काय विपरित परिणाम होतो? कमी झोपलं, जागरणं केली तर त्यानं काय बिघडतं? आपला वेळ झोपेत वाया घालवण्यापेक्षा त्याचा ‘सदुपयोग’ करणं केव्हाही चांगलंच नाही का?..झोपेचा आणि वजनवाढीचा खूप जवळचा संबंध आहे, असं सांगितल्यावर तर या माणसाला वेड लागलंय की काय, असंच ऐकणाºयाचा समज होतो..पण थांबा, याबद्दलचे गैरसमज इथेच थांबलेले नाहीत.आपल्या शरीराच्या कॅलरीज जागेपणी जेवढ्या जळतात, त्यापेक्षा जास्त कॅलरीज झोपेत जळतात, असं सांगितलं तर अनेकांना फिट यायचीच तेवढी बाकी राहील.पण शास्त्रज्ञांनी याबाबत मुलभूत संशोधन केलेलं असून याबाबतची आकडेवारीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे.शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, संपूर्ण दिवसभरात आपल्या जेवढ्या कॅलरीज जळतात, त्यातल्या सुमारे ६० ते ६५ टक्के कॅलरीज ज्यावेळी आपण झोपेत असतो, त्यावेळी जळतात! त्याचवेळी जागेपणी मात्र आपल्या ३५ ते ४० टक्के कॅलरीजच फक्त जळतात.याचाच स्पष्ट अर्थ असा, जर तुम्ही कमी झोपत असाल, तुमची जागरणं जास्त असतील, तर तुमच्या कमी कॅलरीज जळतील आणि त्यामुळे अर्थातच तुमचं वजन वाढेल!हे जर सातत्यानं होत गेलं, तर तुमच्या पोटाचा नगारा व्हायला वेळ लागत नाही.झोप आणि वजन यांचं ‘मैत्र’ आहे ते असं!