शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं वजन वाढतच चाललंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 17:45 IST

तुमच्या ‘झोपेत’ त्याचं उत्तर दडलेलं असू शकेल!

ठळक मुद्देकमी झोपेमुळे वजन वाढतं, याचं कारण हार्मोन्समध्ये होणारे बदल.लेप्टिन हार्मोन्स आपल्या शरीराच्या फॅट सेल्सपासून तयार होतात. कुठल्याही खाण्यानंतर आपली तृप्ती झाली की हे हार्मोन्स मेंदूला सांगतात, आता थांब.घ्रेलिन हार्मोन्स आपल्या पोटापासून निर्माण होतात आणि ते मात्र आपल्या शरीराला सांगत असतात, आपलं खाणं सुरू ठेव!

- मयूर पठाडेतास-दोन तास कमी झोपलं तर त्यानं एवढं काय बिघडतं, असं आपल्याला वाटतं, त्याकडे आपण दुर्लक्षही करतो. अनेक जण तर अभिमानानं सांगतात, मी रात्री बारा-एकशिवाय कधीच झोपत नाही. सकाळीही लवकर उठतो. पुढे जायचं असेल, काही करून दाखवायचं असेल, तर झोपेत आयुष्य घालवून काय उपयोग?..पण शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, झोपेचा आणि तुमच्या आरोग्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. पुरेशी झोप तुम्ही घेतली नाहीत, तर अंतिमत: तुमचं आयुष्यच कमी होईल. झोपेचा आणि लठ्ठपणाचा, वजनवाढीचाही खूप जवळचा संबंध आहे.कमी झोपेमुळे वजन वाढतं, याचं कारण हार्मोन्समध्ये होणारे बदल. आपली भूक ही मुख्यत: दोन प्रकारच्या हार्मोन्सवर अवलंबून असते, लेप्टिन आणि घ्रेलिन.लेप्टिन हार्मोन्स हे मुख्यत: आपल्या शरीराच्या फॅट सेल्सपासून तयार होतात. जेवणानंतर किंवा कुठल्याही खाण्यानंतर आपली तृप्ती झाली की हे हार्मोन्स मेंदूला सांगतात, आता थांब.घ्रेलिन हार्मोन्स आपल्या पोटापासून निर्माण होतात आणि ते मात्र आपल्या शरीराला सांगत असतात, आपलं खाणं सुरू ठेव!ज्या व्यक्ती कमी किंवा अगदी पाच तासांपेक्षाही कमी झोपतात, त्यांच्या शरीरातील लेप्टिन हार्मोन्सचं प्रमाण जवळपास १५टक्क्यांनी कमी होतं, तर घ्रेलिन हार्मोन्सचं प्रमाण १५ टक्क्यांनी वाढतं. त्यामुळे साहजिकच जे लोक कमी खातात, त्यांच्यात खाणं सुरू ठेवण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. त्यांची ‘तृप्ती’ होत नाही आणि समाधानही होत नाही.. त्यामुळे अर्थातच या खाण्यामुळे ज्या अतिरिक्त कॅलरीज आपल्या शरीरात जमा होतात, त्याचं चरबीत रुपांतर होतं आणि आपलं वजन कलेलकलेनं, अन् त्याचबरोबर हळूहळू किलो किलोनं वाढत जातं. या गरगरीत बॉडीचे काय दुष्परिणाम होतात, असतात, ते खरं तर प्रत्यक्ष आपण त्या फेजमधून जात नाही, त्याशिवाय कळत नाही. पण जेव्हा कळतं तेवह फार उशीर झालेला असतो आणि त्यासाठीचे कष्टही मग खूप घ्यावे लागतात.