तुम्हाला खूप जगायचंय? नातवंडं, पतवंडं पाहायचीत?

By Admin | Published: June 9, 2017 06:56 PM2017-06-09T18:56:56+5:302017-06-09T18:56:56+5:30

आयुष्याची दोरी बळकट करायची असेल तर जाणून घ्या या गोष्टी..

You want to live a lot? Do you see grandchildren, grandchildren? | तुम्हाला खूप जगायचंय? नातवंडं, पतवंडं पाहायचीत?

तुम्हाला खूप जगायचंय? नातवंडं, पतवंडं पाहायचीत?

googlenewsNext

- मयूर पठाडे

एक फळ म्हणून चिकू काही जणांना आवडत असेल, काहींना आवडत नसेल, आजारपणात पथ्यपाणी म्हणूनही काही जण चिकू खात असतील, पण हाच चिकू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
चिकू आपलं आयुष्य वाढवतो, असं जर तुम्हाला सांगितलं तर?
तुम्ही म्हणाल, काहीही!
पण ते खरं आहे आणि संशोधनानं सिद्धही झालं आहे.
चिकूत अनेक औषधी गुणधर्म तर आहेतच, पण त्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या क जीवनसत्त्वामुळे चिकू अनेक आजारांपासूनही आपल्याला दूर ठेवतो.

त्यामुळे आजकाल केवळ आजारपणातच नव्हे, अगदी नेहमीसाठीही चिकू खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. रोजचा एक चिकू तुमचं आरोग्य सदाबहार करील.

काय आहेत चिकूचे फायदे?

 


१- तुम्हाला जर हृदयाचे विकार असतील किंवा त्या आजारांपासून तुम्हाला वाचायचं असेल, तर रोज किमान एक तरी चिकू तुम्ही खायला हवा.

२- तुम्हाला जर शुगरचा प्रॉब्लेम असेल, तरीही त्या समस्येपासून चिकू तुम्हाला दूर करू शकतो.

३- चिकू हे एक असं फळ आहे, ज्याच्या नियमित सेवनानं तुमची थकावट पूर्णत: दूर होऊ शकते.

४- अनेक जणांना चिकू खाताना त्याचं साल फेकून देण्याची सवय असते. पण असं चुकूनही करू नका. कारण चिकूच्या सालातही खूप आरोग्यकारी गुणधर्म आहेत.

५- चिकूचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे चिकू रक्तवर्धक आहे. तुमच्या शरीरात जर रक्ताची कमतरता असेल, तर चिकूच्या सेवनानं शरीरातील रक्ताच्या वाढीस मदत होऊ शकते.

Web Title: You want to live a lot? Do you see grandchildren, grandchildren?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.