शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात होणार योग अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:26 IST

या अभियानात प्रशिक्षण आणि शिक्षण असे दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे.

“शरीर माध्यम खलू द्यर्म साद्यनम”म्हणजे कोणतेही सत्कार्य साधायचे असेल तर शरीर ठणठणीत असल्याशिवाय त्या कार्याचीपुर्ती होऊ शकत नाही. मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून आहे. शरीर स्वस्थ असावे यासाठी आज योग महत्वाचा आहे, असे मत राष्ट्रीय योगा कमेटीचे सदस्य गौरांग चंदाराणा यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले.वयाच्या तेरा वर्षांपासून गौरांग चंदाराणा हे योगा करत असून,त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील ही योग साधना आता जनकल्याणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.चार बड्या आंतरराष्ट्रीय बँकेंमध्ये ते उच्च पदावर काम करत होते तिथून स्वेच्छानिवृत्ती घेत पुढील आयुष्य हे योगाचे महत्व सामान्य जनतेला समजवण्यात घालवणार आहे. शासनाच्या योगा कमेटीवरदेशभरातून ज्या दहा मान्यवरांची नेमणूक झाली आहे त्यात गौरांग चंदाराणा यांचा देखील समावेश आहे. गौरांग पुढे सांगतात की, आज धकाधकीच्या जीवनात लोकांकडे बोलायला वेळ नाही त्यात व्यायाम आणि योगासाठी वेळ कुठून काढणार? आज योग शिकण्यासाठी परदेशातून लोकं इथे येतात आणि अजूनही आपण त्याबाबत हवे तेवढे उत्साही नाहीत.योग असा प्रकार आहे ज्यात तुमच्या उपलब्ध वेळेत योग साधना करून तुम्ही स्वस्थ राहू शकता, त्यासाठीच गौरांग यांनी संपूर्ण महाराष्ट्रात योग अभियान राबविण्याचे ठरवले आहे. याबद्दल ते सांगतात की, वेल झी आणि अभिष्टी या संस्थेअंतर्गत मार्च महिन्यासापासून महाराष्ट्रात योग अभियान राबवण्यात येईल. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्रातील अति दुर्गम भागात हे अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी एकूण तीस योगा शिक्षकांची टीम तयार करण्यात आली आहे ज्यात २९महिला आहेत.या अभियानात प्रशिक्षण आणि शिक्षण असे दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे. म्हणजे वैयक्तिक जीवनासाठी देखील योगा शिकता येणार आहे आणि ज्यांना योग प्रशिक्षक व्हायचे आहे त्यांना देखील शिकवले जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, नागपूर, कोल्हापूर येथील अनेक जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था यांनी याबाबत उत्साह दाखवला आहे.महाराष्ट्रातील कोणतीही शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, योग संस्था देखील यासाठी त्यांना मोफत संपर्क करू शकता –गौरांग चंदाराणा ९८९२२४८४०८