शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जागतिक मलेरिया दिवस : मलेरियाची काळजी घ्या, नाहीतर ठरू शकतो जीवघेणा ; पाच वर्षात ७८ मृत्यू, ७२,७६६ रुग्ण

By संतोष आंधळे | Updated: April 24, 2024 20:33 IST

डासाच्या चाव्यामुळे होणार मलेरिया हा आजार असून ॲनाफिलीस डासाच्या प्रजातीमधील मादी डासामुळे होतो.  ही मादी डास साठलेल्या पाण्यामध्ये वास्तव्य करुन अंडी घालत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :  गेल्या काही वर्षात शहरात इमारतीचे बांधकाम आणि रस्त्याची डागडुजी याचे काम वर्षभर कायम सुरु असते. यामुळे विशेष करून पावसाळ्यात या आजराच्या रुग्णाची संख्या वाढते. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात  या आजरामुळे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७२ हजारापेक्षा अधिक रुग्णांना याची लागण झाली आहे.  हा आजार झाल्यानंतर त्याची वेळीच काळजी घेणे गरजचे आहे. अन्यथा गुंतागुत निर्माण हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

डासाच्या चाव्यामुळे होणार मलेरिया हा आजार असून ॲनाफिलीस डासाच्या प्रजातीमधील मादी डासामुळे होतो.  ही मादी डास साठलेल्या पाण्यामध्ये वास्तव्य करुन अंडी घालत असल्यामुळे या आजराचा  त्रास होऊ नये म्हणून या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली करून परिसर स्वच्छ ठेवाणे गरजेचे आहे. या आजारांमध्ये  रुग्णाच्या शरीरात रक्तामधील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत जाते. काही वेळा उपचाराचा भाग म्हणून बाहेरून सुद्धा प्लेटलेस दिल्या  जातात.   जागतिक आरोग्य संघटने दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. मलेरिया आजाराच्या जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

बचाव कसा कराल ?

लहाने मुले आणि गर्भवती स्त्रिया यांना या आजाराचा धोका सर्वात जास्त प्रमाणात असतो. कारण या दोघांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. विशेष करून संध्याकाळी मलेरियाचे डास चावतात. डास एका जागी बसू नये म्हणून घरात पंखा, एसीचा वापर करावा, तसेच संध्याकाळच्या वेळेत दरवाजे बंद असावेत. तसेच खिडक्यांना जाळ्या बसून घ्याव्यात, असे डॉक्टर सांगतात. तसेच डास मारण्याच्या औषधाचा वापर करावा. झोपताना संपूर्ण अंगभर कपडे घालून झोपावे, त्यामुळे डास चावणार नाहीत. तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.लक्षणेताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, खूप ताप येणे.मलेरियाचा डास चावल्यानंतर १०-१५ दिवसांत ही लक्षणे दिसतात.मलेरियामध्ये चार प्रकार आहेत. त्यानुसार आपण औषधे रुग्णांना देतो. मलेरिया सुरुवातीच्या काळात व्यवथित उपचार घेतला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. मलेरियाच्या अधिक गुंतागुंतीमुळे त्याचा परिणाम शरीरावरील विविध अवयवांवर होऊन तो रुग्ण मृत पावल्याच्या घटना घडतात. विशेष करून मलेरियाचा यकृत, फुफ्फुस, मेंदूवर परिणाम होतो. मलेरियावरील चांगली औषधे बाजारात आहेत. त्याचा योग्य वेळी वापर केला पाहिजे. तसेच काही वेळा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करावे लागते. आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.- डॉ मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यक शास्त्र, सर जे. जे. रुग्णालय.

गेल्या पाच वर्षातील राज्यातील मलेरिया रुग्णांची नोंद

वर्ष-------रुग्ण नोंद---------- मृत्यू  २०१९----८८६६---------------७२०२०----१२९०९-------------१२२०२१----१९३०३-------------१४२०२२---१५४५१-------------२६२०२३---१६१५९--------------१९२०२४---२०३८----------------०(मार्च )

टॅग्स :Malariaमलेरिया