शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

Earth Day Special : पर्यावरणाची काळजी घेतली तर, पृथ्वीसोबतच आरोग्यही जपण्यास मदत होइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 15:44 IST

आज संपूर्ण जगभरामध्ये 'जागतिक वसुंधरा दिवस' साजरा करण्यात येत आहे. खरं तर एका दिवसापुरता वसुंधरा दीन साजरा करून काहीही साध्य होणार नाही.

(Image Credit : skipprichard.com)

आज संपूर्ण जगभरामध्ये 'जागतिक वसुंधरा दिवस' साजरा करण्यात येत आहे. खरं तर एका दिवसापुरता वसुंधरा दीन साजरा करून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी प्रत्येक दिवशी आपली जबाबदारी ओळखून वागणं गरजेचं असतं. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखणं, वातावरण प्रदूषणविरहीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणं यांसारख्या गोष्टी आचरणात आणल्यामुळे पर्यावरण उत्तम राखण्यास मदत होते. पण तुम्हाला माहीत आहे का? सध्या मानवाने प्रदूषणाची एवढी हानी केली आहे की, आपण सर्वचजण प्रदुषित वायूमध्ये श्वास घेत आहोत. जे आपल्याला अनेक आजारांच्या विळख्यात अडकविण्यासाठी तयार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, संपूर्ण जगभरामध्ये 102 असे आजार आहेत, ज्यांमध्ये 85 आजार होण्यामागील मुख्य कारण हे प्रदूषण आहे. अशातच पृथ्वीवर शांत आणि हेल्दी जीवन जगण्यासाठी वायू आणि जलप्रदूषणापासून बचाव करण्यासाठी काही उपाय करणं फायदेशीर ठरतं. 

कोण-कोणते आहेत आजार?

मलेरिया, कॅन्सरचे काही प्रकार, पोटासंबंधिच्या समस्या आणि श्वसनाशी संबधित इन्फेक्शन, अस्थमा यांसारखे आजार प्रदूषित वातावरणात राहिल्याने होतात. पर्यावरण विशेषज्ञांनुसार, वातावरणामध्ये पसरणाऱ्या प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत. जर वाढत्या प्रदूषणावर वेळीच आळा घालण्यात आला नाही तर यामुळे इतरही अनेक परिणामांचा सामना करावा लागू शकतो. 

(Image Credit : NRDC)

जल प्रदूषण अत्यंत घातक 

स्वच्छ पाण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही मानकं तयार केली आहेत. त्यांच्यानुसार, 100 ते 150 स्तर टीडीएस असणारं पाणी स्वच्छ असतं. तुमच्या घरामध्ये जर आरओ (रिवर्स ऑसमोसिस) किंवा यूवी सिस्टिम असेल तर त्या तपासून घ्या. अनेकदा मिनरल वॉटर किंवा सप्लाय करण्यात आलेलं पाणी देखील पूर्णपणे शुद्ध नसतं. यामध्ये शरीराला नुकसान पोहोचवणारे जीवाणू गियार्डिया (Giardia) असतात. अनेकदा कंपन्या पाणी स्वच्छ करण्यासाठी नदी, नाले, तसेच भूमिगत स्त्रोत इत्यांदीमधून पाणी आणतात. हे पाणी स्वच्छ करण्यासाठी कोएगुलेंट (coagulants) केमिकल वापरण्यात येतं. हे केमिकल पाण्यामध्ये असणारे घाण स्वच्छ करतात. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी असतं. 

(Image Credit : NRDC)

वायु प्रदूषणामुळे वाढतात श्वसनाचे विकार

आपल्याला जगण्यासाठी श्वास घेणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु आपण प्रत्येक दिवशी प्रदूषित वातावरणामध्ये श्वास घेत असू तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. यामुळे अनेकांना श्वसानाच्या अनेक विकारांचा सामना करावा लागतो. हवेमध्ये अस्तित्वात असलेलं कार्बन मोनोऑक्साइड एखाद्या विषाप्रमाणे असतं. अशातच आपल्याला हा प्रयत्न करणं गरजेचं असतं की, घरातून बाहेर पडताना चांगल्या गुणवत्तेचा मास्क नक्की वेअर करा. 

कचऱ्याचा ढिगारा

आसपास जमा झालेली घाण आणि कचऱ्यामुळे वातावरण खराब होतं. वर्तमानमध्ये सर्वात जास्त प्रयोग करण्यात येणार प्लास्टिक अत्यंत हानिकारक आहे. अनेक संशोधनांमधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, जर आपल्या आजूबाजूचं वातावरण दूषित असेल तर यामुळे अनेक आजार होतात. गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांवरही या सर्व गोष्टींचा परिणाम होत असतो. 

आहारामुळेही होतो परिणाम

शरीराला स्वस्थ आणि उर्जावान बनायचं असेल तर पौष्टिक आहाराचं सेवन गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही प्रदूषित वातावरणामध्ये पौष्टिक आहाराचं सेवन करत असाल तर यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकंपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :Earthपृथ्वी