जर सर्वकाही सुरळित पार पडले, तर तो दिवस दूर नसेल, जेव्हा कैंसरच्या निदानापासून ते व्हॅक्सीनेशनपर्यंत सर्व काही केवळ 48 तासांच्या आत होईल. तेही अगदी सहजपणे. खरे तर, ओरेकल (ORACLE) चे CEO लॅरी एलिसन यांनी बुधवारी (22 जानेवारी) मोठा दावा केला आहे की, AI च्या मदतीने कॅन्सरचे निदान करणे आणि त्याची कस्टम व्हॅक्सीन तयार करणे सोपे होऊन जाईल. मात्र, यासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
जर लॅरी एलिसन यांनी कॅन्सरवरील लस तयार केली, तर अशी कामगिरी करणारा अमेरिका हा दुसरा देश ठरेल. यापूर्वी रशियाने ही लस तयार केल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षीपासून, त्याच्या देशात मोफत लसीकरणालाही सुरू होईल.
अमेरिका कॅन्सरच्या उपचारात बऱ्याच काळापासून काम करत आहे. गेल्या वर्षी मे 2024 मध्ये फ्लोरिडा यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी कॅन्सर झालेल्या चार रुग्णांवर पर्सनलाइज्ड व्हॅक्सीन अथवा लसीची टेस्ट देखील केली होते. यानंतर, वैज्ञानिकांनी दावा केला होता की, लस दिल्यानंतर दोन दिवसांनी रुग्णांमध्ये जबरदस्त इम्यूनिटी तयार झाली होती. रशियानंतर जर अमेरिकेत ही लस तयार झाली तर याचा फायदा संपूर्ण जगाला होईल.
कॅन्सर हा एक अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आजार आहे. दरवर्षी लाखो लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, कर्करोग हा जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. जगभरातील प्रत्येक ६ मृत्यूंपैकी एकाचे कारण कॅन्सर आहे.