शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

आईकडून बुद्धी, तर बाबांकडून मिळताे टेन्शनचा वारसा; तब्बल १८ संशोधन, रिपोर्ट वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 06:38 IST

तब्बल १८ जागतिक संशोधनांच्या निष्कर्षांचा अर्क

नवी दिल्ली : घरात नवजात अर्भकाचे आगमन होत नाही तोच, तो नेमका आईवर गेला की बाबांवर याच्या चर्चा सुरू होतात. मुलगा मोठा झाल्यानंतर भांडणातही निघते की, तो अगदी आईवर किंवा बाबांवर गेलाय; पण तब्बल १८ जागतिक संशोधनांच्या निष्कर्षांतून हे वाद संपुष्टात येऊ शकतील. कारण मुलांना बुद्धीचा वारसा आईकडून, तर वडिलांकडून  टेन्शन घेण्याचा वारसा मिळत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले.  केंब्रिज विद्यापीठाच्या २०१६ च्या अभ्यासानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये ग्लासगो वैद्यकीय संशोधन परिषदेने केलेल्या अभ्यासात याची पुष्टी झाली. 

मुलांची बुद्धिमत्ता ठरविते एक्स गुणसूत्रमुलांच्या बुद्धिमत्तेसाठी एक्स गुणसूत्र जबाबदार असल्याचे संशोधनात म्हटले आहे. स्त्रियांमध्ये दोन्ही एक्स गुणसूत्र असल्यामुळे, मुलांना वडिलांच्या तुलनेत आईकडून बुद्धिमत्ता मिळण्याची शक्यता दुप्पट असते. पुरुषांमध्ये एक एक्स गुणसूत्र आणि एक वाय गुणसूत्र असते. पुरुषांमध्ये आढळणारे ‘वाय’ गुणसूत्र घाई, राग आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरील तणाव इत्यादीशी संबंधित आहे. त्यावर संशोधनात शिक्कामोर्तब झाले. 

३५ वर्षांच्या मातांची मुले अधिक हुशार, पण...इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमधील नवीन अभ्यासात आढळून आले की, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मातांच्या मुलांची बुद्धी ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मातांच्या तुलनेत जास्त आहे. मात्र, या मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.

बुद्धिमत्तेचा वारसा केवळ ४० ते ६० टक्केबुद्धिमत्तेपैकी केवळ ४० ते ६० टक्के वंशपरंपरागत असते. कौटुंबिक वातावरण, शाळा, आजूबाजूचे वातावरण, मित्रांच्या सवयी इत्यादींचा प्रभाव उर्वरित्त टक्क्यांत येतो, असे भारतासह आशिया, अमेरिका आणि युरोपमधील १८ वैज्ञानिक संशोधनांमध्ये म्हटले आहे. 

आईवरचे प्रेम अवघड कामही सोपे करतेजी मुले त्यांच्या आईशी मनापासून जोडलेली होती त्यांनी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून जटिल खेळ खेळण्याची क्षमता विकसित केली. ते उद्दिष्टांप्रती वचनबद्ध राहिले आणि समस्या सोडवण्यात कमी निराश दिसले. तसेच मेंदूच्या काही भागांच्या विकासासाठी आईचे प्रेम महत्त्वाचे आहे, असे संशोधनात म्हटले.