शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

डोक्याला शॉट लागला की झोप का उडते?; चिंता कमी करा! असा सल्ला अनेकजण देतात. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 08:19 IST

तुम्हाला तुमच्या मालाकरिता एक ऑर्डर मिळालेली आहे आणि तीस दिवसात माल पोचवायचा आहे. तुम्ही दक्ष मालक असल्याने मजुरांवर देखरेख ठेवाल

दिवस आणि रात्र, जाग आणि झोप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर झोप स्वस्थ असेल, तर उत्तम जाग असते. तसेच बेताचीच चिंता आणि दिवसभर सजगता असेल तर रात्रीची झोप चांगली असते. थोडीशी म्हणजे अगदी चिमूटभर चिंतातुरता (ॲन्क्झायटी) असली तर एक प्रकारचे उद्दिपन येते, सजगता वाढते आणि हातातले काम चांगले होते. परीक्षेच्या अगोदर असलेली थोडीशी चिंतातुरता ही पेपर लिहिताना आपल्या स्मरणशक्तीला चालना देते. अजिबातच चिंता नसेल तर ढिस्सपणा येतो. पण जशी ह्या चिंतातुरतेची पातळी वाढत जाते, तसे आपल्या कामाची क्षमता कमी होते आणि एका मर्यादेनंतर आपली झोप बिघडायला सुरुवात होते. 

चिंता कमी करा! असा सल्ला अनेकजण देतात. पण या कोरड्या सल्ल्याचा काय उपयोग होतो? समजा तुम्ही एका छोट्या फॅक्टरीचे मालक आहात तुमच्या या छोट्या कारखान्यात २० प्रशिक्षित मजूर काम करतात. तुम्हाला तुमच्या मालाकरिता एक ऑर्डर मिळालेली आहे आणि तीस दिवसात माल पोचवायचा आहे. तुम्ही दक्ष मालक असल्याने मजुरांवर देखरेख ठेवाल, नेहमीचे काम असल्याने तुमच्या चिंतेची पातळी कमी असेल. सुरुवातीलाच पाच मजुरांनी काही कारणाने सुट्टी घेतली, तुमच्याकडे तेवढेच काम करायला पंधरा मजूर उरले.. मग तुमच्या चिंतेची पातळी थोडी वाढेल. कुणी टिवल्याबावल्या करताना दिसला, जेवणाची आणि चहापाण्याची वेळ पाच मिनिटांनी वाढली तरी ओरडायला लागाल. पण काम होईलच यावर तुमचा विश्वास असेल. आता समजा , तुमच्या ओरडण्याला कंटाळून पाच मजूर निघून गेले. फक्त दहा मजूर शिल्लक.. तुमच्या चिंतेची पातळी वाढेलच. सतत येरझाऱ्या मारायला लागाल. काम होईल? ना ? अशी शंका डोकावू लागेल. एका प्रकारचे असहायतेचे सावट येईल. आता समजा अतिश्रमाने पाच मजूर आजारी पडले.. तुमच्या काळजात धडधड होईल. येरझाऱ्या  तर वाढतीलच पण काम होणारच नाही ,झाले तरी दिलेल्या वेळात होणार नाही, असा पक्का विचार मनात होईल? नैराश्याची भावना (होपलेसनेस )प्रबळ होईल.. अशा रीतीने मजूर कमी व्हायला लागल्यानंतर तुमचा प्रवास थोडीशी चिंता /सजगता ते वाढलेली चिंता ,असहाय्यपणा  ते नैराश्य अशी स्टेशने घेत होईल..आणि तुमची झोप उडेल.

- डॉ. अभिजित देशपांडे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस iissreports@gmail.com