शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दरवाज्यात जाताच काम का विसरतो? हा आहे मेंदूचा ‘डोअरवे इफेक्ट’; मेंदूची एक स्मार्टगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:57 IST

डोअरवे इफेक्ट म्हणजे काय? असे नाव का दिले? वाचा सविस्तर

वॉशिंग्टन: एखादे काम करण्यासाठी आपण दुसऱ्या खोलीत जातो आणि तिथे पोहोचताच का गेलो होतो हेच विसरतो, असे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी झालेले असते. पण यात काळजी करण्यासारखे काहीही नाही. ही कोणत्याही आजारपणाची लक्षणे नसून मानवाच्या मेंदूची एक सामान्य आणि स्मार्ट प्रक्रिया आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या प्रकाराला विज्ञानाने डोअरवे इफेक्ट, असे नाव दिले आहे.

यासंदर्भात आरोग्य तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे की, जेव्हा आपण एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो, तेव्हा आपला मेंदू त्या बदलाकडे एक नवीन घटना म्हणून पाहतो. मेंदू जुन्या कामाशी संबंधित माहिती मागे ठेवून नवीन वातावरणासाठी स्वतःला तयार करतो. त्यामुळेच आपण नेमकं काय करायला आलो हे विसरतो.विसरभोळे आहोत की काय, असे वाटते. पण तसे मनातही आणू नका.

आपल्या मेंदूचा ‘रीसेट मोड’ कसा काम करतो?

मेंदू हा एका स्मार्टफोनसारखे काम करतो. जसे फोनमध्ये अनेक ॲप्स विंडो सुरू असतात. ज्यांची गरज नसते असे ॲप्स आपण बंद करतो. फोन स्लो होऊ नये म्हणून केलेली ही कृती असते. तसेच आपला मेंदूही अनावश्यक माहिती काढून टाकतो. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थच्या मते डोअरवे प्रक्रियेमुळे कार्यक्षमता सुधारते. त्यामुळे आपला विसराळूपणा ही कमजोरी नसून मेंदूची स्वतःला कार्यक्षम राखण्याची एक पद्धत आहे.

ही समस्या कधी जाणवू शकते वा वाढू शकते ?

जरी ही एक सामान्य प्रक्रिया असली, तरी काही परिस्थितीमध्ये ती अधिक जाणवू शकते. जसे कामाचा जास्त ताण किंवा थकवा किंवा एकाच वेळी अनेक कामं करणे. तसेच झोपेची कमतरता. या अवस्थांमध्ये मेंदू आधीच माहितीच्या माऱ्याने ओव्हरलोड असतो, त्यामुळे नवीन जागी गेल्यावर जुनी माहिती पटकन विसरली जाते. तरीही मेंदूला काही प्रसंग आठवतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Forget why you entered a room? It's the 'Doorway Effect'.

Web Summary : Forgetting tasks upon entering rooms is normal, a 'Doorway Effect,' says science. The brain resets, prioritizing new environments by discarding old information like a smartphone closing unused apps. Stress, fatigue, and sleep deprivation exacerbate this, but it's the brain's way of staying efficient.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सscienceविज्ञान