शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हेल्दी फूड टेस्टी नसतं हे कोणी सांगितलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 17:08 IST

उकडलेले, वाफवलेले, बिन तिखटामिठाचे पदार्थ म्हणजेच हेल्दी फूड हा अपप्रचार..

ठळक मुद्देहेल्दी फूडला टेस्ट नसते, हे वर्षानुवर्षांपासून आपल्या डोक्यात बिंबवलं गेल्यामुळे अनेक जण त्यापासून दूर राहतात.हेल्दी फूडमुळे अनेक आजार तुम्ही तुमच्यापासून दूर राखू शकता. तुमची एनर्जी लेवलही त्यामुळे वाढते. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.वेटलॉससाठीचा तर तो महामंत्र आहे.

- मयूर पठाडेअनेकांपुढे महत्त्वाचा प्रश्न असतो.. हेल्दी फूड कि टेस्टी फूड?... त्यांचं म्हणणं असतं, आरोग्य चांगलं राखायला आमची ना थोडीच आहे? पण हेल्दी फूड बेचव असतं. त्याला काहीच टेस्ट नसते. कारण आजवर सगळ्यांचा तोच समज आहे. हेल्दी फूड म्हणजे काहीतरी नुसतंच उकडलेलं, वाफवलेलं, कमी तिखटा-मिठाचं!.. अर्थातच त्या अन्नाला जर चवच नसली तर कोणीच त्याकडे फिरकणार नाही...पण हा आपला गैरसमज आहे किंवा त्याला जाणूनबुजून प्रसिद्धीही दिली गेलीय. हेल्दी फूड टेस्टीही असू शकतं. नव्हे, असतंच. अर्थातच तुम्ही ते कसं बनवता यावर सारं काही अवलंबून असतं. पण हेल्दी फूडला टेस्ट नसते, हे वर्षानुवर्षांपासून आपल्या डोक्यात बिंबवलं गेल्यामुळे अनेक जण त्यापासून दूर राहतात किंवा ते ट्राय करायलाही नकार देतात.यासंदर्भात नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार तर सिद्ध झालं आहे की हेल्दी फूडच जास्त टेस्टी असतं. त्यामागचा नकारात्मक विचार आणि आपले पूर्वग्रह मात्र आपण सोडायला हवेत.आहार या घटकाकडे जरी आपण थोडं बारकाईनं लक्ष दिलं तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतं. तुमचं आरोग्य सुधारतं. अनेक आजार तुम्ही तुमच्यापासून दूर राखू शकता. तुमची एनर्जी लेवलही त्यामुळे वाढते. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. वेटलॉससाठीचा तर तो महामंत्र आहे. त्यामुळे हेल्दी फूड टेस्टी नसतं या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून तुम्ही असा आहार सुरू तर करा, बघा काय फरक पडतो ते! आणि केवळ वाफवलेलं, उकडलेलं म्हणजेच ‘हेल्दी’, हे आपल्याला सांगितलं तरी कुणी? हेल्दी फूडही चमचमीत आणि हवेहवेसे असू शकतात. त्याची ‘टेस्ट’ मात्र आपण घ्यायला हवी.