शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जन्मत:च हृदयदोष असलेल्या मुलांचे आपण काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 05:54 IST

७ ते १४ फेब्रुवारी यादरम्यान जगभर जन्मजात हृदयदोषाविषयीचा जागृती सप्ताह पाळला जातो. यानिमित्ताने भारतातल्या परिस्थितीची चर्चा

डॉ. राजेश शर्मा

अध्यक्ष, पेडियाट्रिक कार्डियाक सोसायटी ऑफ इंडिया, हृदय शल्यविशारद

जन्मजात हृदयदोषाविषयी भारतात काय स्थिती आहे? आपल्या देशात शंभरामागे एका मुलात हा दोष आढळतो. त्यातल्या २० टक्क्यांवर उपचारांची गरज असते. इथल्या जन्मदरानुसार २४०००० मुले हा दोष घेऊन जन्मतात. अनुभवी बाल शल्यक्रिया विभागात त्यांच्यावर होणारे उपचार ९५ टक्के यशस्वी होतात. वेळीच उपचार झाले नाहीत तर मात्र वाढत्या वयात अडचणी उद्भवतात. हालचालींवर बंधने येतात. मोफत उपचार किंवा आर्थिक मदत करून सरकार याबाबतीत पुढाकार घेते. परंतु यातल्या बहुतेक योजना सरकारी इस्पितळात उपलव्ध आहेत. ‘एम्स’सारख्या ठिकाणी रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी असते. आयुष्मान किंवा राष्ट्रीय बाल सेवा कार्यक्रम खाजगी रुग्णालयाकडे उपलब्ध असला तरी सरकार देते त्याच्या दुप्पट शुल्क तेथे घेतले जाते. त्यांना अशा योजना नकोच असतात. तरी या आजारावरील उपचारात त्यांनी बरेच योगदान दिले आहे.

रुग्णाच्या पैशातून सगळे खर्च भागवायचे असल्याने तेथे दुप्पट, तिप्पट खर्च येतो. प्रतीक्षायादी जवळपास नसते. सरकारी योजनातून मिळणारी मदत गुंतागुंतीच्या आजारात पुरेशी नसते. तरी परवडत नसतानाही लोकांना इथली सेवा घ्यायची असते. ८० टक्के रुग्ण मुलांचा खर्च आईवडील करतात. कधी कधी तो आवाक्याबाहेर जाऊन ते कर्जबाजारीही होतात. भारत आता वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र होऊ पाहत आहे. पश्चिम किंवा पूर्वेकडील देशांपेक्षा इथले शुल्क कमीच असते. मात्र अनेक भारतीय पालकांना हा खर्च न झेपणारा असतो. भारतात वैद्यकीय विमा योजनांमध्ये अपवाद वगळता जन्मजात दोषांना संरक्षण नसते. श्रीमंतांना खर्च झेपतो. गरिबांकरिता दारिद्र्यरेषेखालील योजना असतात. करदाता मध्यमवर्ग मात्र वाऱ्यावर सोडला जातो. या वर्गाच्या मुलाना हे संरक्षण नको का? मोफत सेवा नाही तर विमा तरी! दुर्दैवाने जन्मजात दोष असणाऱ्या मुलाना आरोग्य विम्याचे कवच मिळत नाही.

जन्मजात दोष आधीपासून असतात असे गृहीत कसे धरले जाते? ते ठरवण्याची व्याख्या सदोष आहे. चाळीशीत मी विमा काढायला गेलो तर काही पूर्व चाचण्या करतात, काही नाही करत. मला मधुमेह असेल तर हप्ता वाढेल, पण अँजिओग्राम न काढता मला विमा मिळतो. मला आधीपासून हृद्रोग असू शकतो तरी! तो काही वर्षभरात होत नाही. मग जन्मजात दोषांना का नकार दिला जातो? गरिबाला सरकारने मदत दिली तर त्याला फायदा होतो हे कर्नाटकात ‘यशस्विनी’ या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विमा योजनेने दाखवून दिले आहे. शेतकरी कुटुंब मासिक ५ रुपये भरते, सरकार तेवढीच रक्कम देते. गर्भार  महिलांसाठी अशी योजना राबवली तर दोष असणारी कमीच मुले जन्मत असल्याने विमा कंपन्यांचे नुकसान होणार नाही.

भारतात  रोज सुमारे ७० हजार मुले जन्मतात. तुम्ही सर्व अवयव ठीकठाक घेऊन जन्मला नाहीत आणि पालक गरीब असतील तर सरकारी रुग्णालयातील प्रतीक्षायादी वाढणारच. मात्र ९७ टक्के लोकांना या प्रश्नाला सामोरे जावे लागत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते.बचावाची ताकद नसलेल्या अतिदुर्बलांना कसे वागवले जाते यावर समाजाचा पोत कळतो. पात्रतेच्या अनेक वर्गवाऱ्या आपण केल्या, पण जन्मजात व्यंग असलेल्या मुलांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. ‘अतिथी देवो भव’ म्हणणाऱ्या या महान संस्कृतीत नवपरिणीत जोडप्याला मिळणाऱ्या मूल्यवान भेटीकडे दुर्लक्ष झाले. व्यंग घेऊन जन्माला येणाऱ्या मुलांना पाठबळ न देण्याची अनैतिक, लाजिरवाणी प्रथा संपवण्याची, त्यांना न्याय देण्याची वेळ आली आहे. आरोग्याचा मूलभूत हक्क आणि सुविधांच्या संदर्भात कोणालाही वगळणे केवळ अमानुष आहे.