शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

घोरण्यावर उपाय काय? जाणून घ्या श्वसनविकार तज्ज्ञांकडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 11:24 IST

झोपेत घोरणाऱ्या काही व्यक्तींना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया हा आजार होऊ शकतो. यामध्ये त्या व्यक्तीला झोपताना नाकातील हवेचा प्रवाह कमी होत असतो.

- डॉ. प्रशांत छाजेड, श्वसनविकार तज्ज्ञपेत घोरणे हे ऐकायला खूपच सामान्य वाटत असले,तरी ‘घोरणे’ याचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. श्वसन प्रक्रियेत अडथळा आणणारे हे लक्षण असून,यावर वेळीच उपचार केले नाहीत,तर भविष्यात जडणाऱ्या अनेक व्याधींना सामोरे जावे लागण्याची शक्यता अधिक बळावते. अनेक जणांना झोपेत घोरायची सवय असते. काहीजण याच्यावर खिल्ली उडवून मोकळे होतात,तर अनेकजण सोईस्कररीत्या दुर्लक्ष करतात. मात्र,घोरण्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय विश्वात शास्त्रीयरीत्या अभ्यास करून नेमके निदान काय,हे शोधून काढले जाते. त्यानंतर,काही व्यक्तींना श्वसन मार्ग सुकर व्हावा,यासाठी झोपण्याच्या वेळी रोज श्वसनाशी निगडित एका उपकरणाचा आधार घेऊन झोपावे लागते,हे कटू सत्य आहे.

झोपेत घोरणाऱ्या काही व्यक्तींना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया हा आजार होऊ शकतो. यामध्ये त्या व्यक्तीला झोपताना नाकातील हवेचा प्रवाह कमी होत असतो. यामागील विशेष कारण म्हणजे तोंड आणि नाकाच्या वरच्या भागात हवा भरते. परिणामी,श्वासनलिका लहान होते. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. या कारणाने त्रास होणाऱ्या रुग्णाचा श्वास झोपेत असताना अचानक थांबतो,हे त्यांनाही कळत नाही. यामध्ये श्वसन घेण्यास त्रास होतो, म्हणून काही लोक दचकून उठतात, तसेच दिवसभर चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी, लक्ष विचलित होणे, अशा गोष्टी घडत असतात. लठ्ठपणा, लहान मान असणाऱ्या रुग्णांमध्ये सर्रास घोरण्याचा प्रकार आढळून येतो. 

घोरण्याचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना झोप पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाल्यासारखे वाटणे,श्वसन मार्गात अडथळे आल्याने हृदयाच्या कार्यावर याचा परिणाम होऊन हृदयविकार होण्याची शक्यता असते; तसेच रक्तदाब,मधुमेह यांसारख्या व्याधींना सामोरे जावे लागते. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये घोरण्याचे प्रमाण अधिक असते.

घोरण्याचा वारंवार त्रास होत असेल,तर झोपेचा अभ्यास करून गरज पडल्यास काही व्यक्तींना सी-प्याप् किंवा बाय-प्याप् गरजेनुसार या दोन वैद्यकीय उपकरणांचा वापर करण्यास सुचवितो,जी झोपेच्या वेळी लागतात. मात्र,काही निवडक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात. हा आजार होऊ नये यासाठी नागरिकांनी व्यायाम करावा,वजन नियंत्रणात ठेवावे.