शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा
2
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
3
Karun Nair : १०७७ दिवसांनी कमबॅक! इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL मध्ये ७ वर्षांनी ठोकली फिफ्टी!
4
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
5
आईच्या बॉयफ्रेंडचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जन्मदातीने पोटच्या पोरीचे व्हिडीओ केले व्हायरल
6
DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!
7
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
8
IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!
9
गडकरींचा एक फोन अन् दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शासकीय मदतीचा मार्ग मोकळा
10
विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
12
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
13
शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत
14
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
15
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
17
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार! त्यांच्यासह बहिणीवर कारवाई होणार, अटक वॉरंट जारी
18
Akash Anand : “मला पुन्हा पक्षात काम करण्याची संधी द्या...“; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी
19
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या हरिदास टेंभूर्णे यांचे निधन
20
Virat Kohli Record : किंग कोहलीचा मोठा पराक्रम; अर्धशतकांच्या 'शंभरी'सह रचला नवा विक्रम

जितकं उपाशी राहू तितकं शरीर स्वतःलाच खातं! अभ्यासाचा दावा - आजारांवर इलाजाचा नैसर्गिक ट्रिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:57 IST

What is Autophagy : मेडिकल विश्वात 'ऑटोफॅगी'ची चर्चा सुरू आहे. पण अनेकांना ऑटोफॅगी काय आहे हे माहीत नाही. तर ऑटोफॅगी मानवी शरीराची एक नॅचरल आणि स्वत:ला वाचवणारी सिस्टीम आहे.

What is Autophagy: मेडिकल विश्वात सतत नवनवीन शोध समोर येत असतात. ज्यात शरीराच्या क्रिया आणि आजारांबाबत आश्चर्यकारक खुलासे केले जातात. सध्या मेडिकल विश्वात 'ऑटोफॅगी'ची चर्चा सुरू आहे. पण अनेकांना ऑटोफॅगी काय आहे हे माहीत नाही. तर ऑटोफॅगी मानवी शरीराची एक नॅचरल आणि स्वत:ला वाचवणारी सिस्टीम आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे शरीराची ही नॅचरल सिस्टीम आणि कशी काम करते.

ऑटोफॅगी म्हणजे काय?

कोलंबिया यूनिव्हर्सिटीतील न्यूट्रिशन डिपार्टमेंटच्या रिसर्चर्सनुसार, ऑटोफॅगी शरीरातील डॅमेज कोशिका साफ करण्याची एक प्रक्रिया आहे. जेणेकरून नवीन आणि निरोगी कोशिका पुन्हा करता याव्यात. ऑटोफॅगीमध्ये "ऑटो" चा अर्थ स्वत: आणि "फॅगी"चा अर्थ खाणं असा होतो. त्यामुळे ऑटोफॅगीचा शब्दश: अर्थ "स्वत: खाणं" असा होतो. ऑटोफॅगी ही क्रिया आपल्या एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

ऑटोफॅगीनं शरीराला कसा मिळतो फायदा?

एक्सपर्टनुसार, ऑटोफॅगीच्या माध्यमातून शरीर आपल्या निष्क्रिय कोशिकांना साफ करतं आणि त्यांचे भाग इतर कोशिकांच्या रिपेअरिंगसाठी आणि सफाई रिसायकल करतं. ऑटोफॅगीचा उद्देश खराब कोशिका साफ करणं आणि नंतर स्वत:ला चांगल्याप्रकारे कामासाठी तयार करणं आहे.

ही प्रक्रिया शरीरात एकाच वेळी रिसायकलींग आणि सफाई दोन्ही करते. ही शरीराच्या सिस्टीमचं रीसेट बटन दाबण्यासारखी प्रक्रिया आहे. यातून कोशिकांना साफ करणं आणि विषारी पदार्थ बाहेर काढणं, जिवंत राहणं आणि काम करण्याची क्षमता वाढण्याची शरीराची एक पद्धत आहे.

अ‍ॅंटी-एजिंगसोबत इतरही फायदे

ऑटोफॅगीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अ‍ॅंटी-एजिंग असणं. यानं शरीराचं वाढतं वय कमी करणं आणि नव्या कोशिका तयार करण्याची एक पद्धत आहे. जेव्हा आपल्या कोशिका तणावग्रस्त असतात, तेव्हा आपली रक्षा करण्यासाठी ऑटोफॅगी वाढते, ज्यामुळे आयुष्य वाढण्यास मदत मिळते. कोशिकांमधून टॉक्सिक प्रोटीन हटवणं आणि मोठ्या प्रमाणात नव्या कोशिका तयार केल्यानं कॅन्सर, पार्किंसन्स आणि अल्झायमरसारख्या आजारात मदत मिळते.

उपवासानं ट्रिगर होते ऑटोफॅगी?

जास्त वेळ उपाशी राहिल्यावर किंवा उपवास करत असताना ऑटोफॅगी सेलुलर कंटेन्ट तोडून आणि आवश्यक क्रियांसाठी याचा पुन्हा वापर करून शरीर चालू ठेवते. यासाठी जास्त ऊर्जा लागते आणि हे नेहमीसाठी सुरू राहत नाही. पण यानं आपल्याला पोषण शोधण्यासाठी अधिक वेळ मिळतो.

नियमित उपवास आणि कीटोजेनिक डाएट ऑटोफॅगीला ट्रिगर करते. कीटोसिस डाएट हाय फॅट आणि कार्ब्सला कमी करत असल्यानं उपवासाशिवायही मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यात उपवासासारखाच फायदा मिळतो.

कॅन्सरच्या उपचारात ऑटोफॅगीची भूमिका?

कॅन्सरला रोखणारा उपचार करण्यात ऑटोफॅगीची भूमिकेमुळेच याकडे फार जास्त लक्ष दिलं जात आहे. कारण जसजसं वय वाढतं, शरीरात ऑटोफॅटी कमी होत जाते. म्हणजे ज्या कोशिका आता काम करत नाही किंवा नुकसान पोहोचवू शकतात, त्या अनेक पटीनं वाढतात.

त्याच कॅन्सरच्या कोशिकांचं रूप घेण्याचा धोका असतो. कोणताही कॅन्सर हा कोणत्या ना कोणत्या विषारी कोशिकांपासून सुरू होतो. नेहमीच ऑटोफॅगिक प्रक्रियांचा वापर करून शरीरात त्या कोशिकांची ओळख पटवणं आणि त्यांना दूर करून कॅन्सर रोखला जाऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधन