शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

स्वयंपाकघरात नक्की काय शिजतंय? हजारो वर्षांपूर्वीच्या नाश्त्याचं ताजं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:47 IST

माणसाचं आयुर्मान वाढलं; कारण वृद्धांच्या आहाराची सोय झाली. लहान बाळांच्या आहारातही प्रचंड क्रांती झाली

स्वयंपाकघरात नक्की काय शिजतंय?- या पूर्वार्धात म्हटल्याप्रमाणे सांजा अथवा लापशी, भरडा हे प्रकार प्रागैतिहासिक काळापासून भारतात अस्तित्वात होतेच. धान्यं दळून भरड, रवा, पीठ काढणं या क्रियांवर मानवाने हळूहळू प्रभुत्व मिळवलं. उकळत्या पाण्यात पीठ शिजवणं या प्रक्रियेमुळे मानवाने उत्क्रांतीतला एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कारण शिजवल्यामुळे धान्ये पचनसुलभ झाली. त्यांचे पोषक गुण मानवाच्या अंगी लागू लागले. 

माणसाचं आयुर्मान वाढलं; कारण वृद्धांच्या आहाराची सोय झाली. लहान बाळांच्या आहारातही प्रचंड क्रांती झाली. धान्यांचं खिमट, पातळ पेज, लापशी हा पचायला हलका पण बलवर्धक शिशुआहार (ज्याला सध्या सीरियल म्हणतात) जवळजवळ बारा हजार वर्षांपूर्वीचा आहे बरं. थोरांसाठीदेखील दणकट नाश्ता म्हणून याची महती जबर. पूर्वीपासून भारतात ज्वारीची/ नाचणीची प्रवाही आंबील, पेज, लुसलुशीत उपमा, शिळा भात रात्रभर पाण्यात भिजवून केलेला पांथा भात, उकड, उकडपेंडी असे कैक प्रकार श्रमिकजन सकाळी खात असत, आजही खातात. पश्चिमी देशांत अठराव्या शतकापर्यंत सीरियलसारखा साधासुधा नाश्ता गरिबाघरचा म्हणून हिणवला गेला; पण गेल्या शतकातल्या संशोधनामुळे या पदार्थांतून मिळणारं पोषण अभिजन वर्गाच्या लक्षात यायला लागलं. दूध फार मोठ्या कालखंडानंतरचं. उंट, बैलांना माणसाळवण्याची सुरुवात दहा हजार वर्षांपूर्वी झाली असली तरी मानवाने प्राणिज दुधाचा समावेश आपल्या आहारात केला तो सहा-सात हजार वर्षांपूर्वी. तेव्हा नाश्त्याच्या पेजेमध्ये, धान्यांच्या भरडीमध्ये दूध, तूप, ताक इत्यादींचा प्रवेश झाला. कालांतराने साखर, गूळ सहज उपलब्ध होऊ लागल्यानंतर शिरा, खीर असे अवतार घडले. सध्या मुलांसाठी, मोठ्यांसाठी प्रोटीन ड्रिंकची चलती आहे. यात मुख्यतः वेगवेगळ्या धान्यांचं चूर्ण असतं. (तीनेक हजार वर्षांपूर्वीच्या महाभारतात अश्वत्थाम्याला पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून दिल्याची गोष्ट आहेच.) आपल्या शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी तत्कालीन मानवाने किती सूक्ष्म निरीक्षण आणि चातुर्य पणाला लावलं असेल! “सिर्फ दो चीजों से बनाइए इतना टेस्टी नाश्ता” अशा व्हिडिओंचा आजकाल ट्रेण्ड आहे. पण, मानवाने ते पदार्थ हजारो वर्षांपूर्वीच घडवले होते. (उत्तरार्ध)

- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)askwhy.meghana@gmail.com