शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शांत झोप येत नाही मग हे खा.. प्या.. !

By madhuri.pethkar | Updated: September 28, 2017 19:08 IST

वेळेवर चांगली, शांत आणि गाढ झोप येण्यासाठी, झोप पूर्ण होवून सकाळी वेळ जाग येण्यासाठी, सकाळी उठल्यानंतर उत्साह वाटण्यासाठी ‘झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाता?’ हे खूप महत्वाचं आहे.

ठळक मुद्दे* झोपण्यापूर्वी कपभर गरम दूध पिणं चांगली सवय आहे.* केळामध्ये चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचे कार्बोहायडेÑटस असतात. जे शरीरात गेल्यावर चांगली झोप आणण्यास मदत करतात.* जवसामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात. तसेच ओमेगा 3 आणि ट्रायप्टोफन हे घटकही असतात. हे घटक मनातील भीती कमी करण्याचंही काम करतात.

- माधुरी पेठकरमाणूस पोटासाठी जगतो, झगडतो, दिवसभर राबराब राबतो. माणसात ही ऊर्जा येते ती इच्छेने आणि चांगल्या खाण्यानं. तसेच यासाठी हवा असतो उत्साह. हा उत्साह येतो तो झोपेमुळे. चांगली झोप माणसाला सदैव तरतरीत आणि तत्पर ठेवते. सकारात्मक दृष्टिकोनानं जगण्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची असते.झोप जर चांगली झाली नाही तर मग दिवसभर मरगळल्यासारखं वाटतं. कामात लक्ष लागत नाही, उत्साह वाटत नाही. शांत गाढ झोप ही मानसिक शांततेसाठी गरजेची असते तसेच शारीरिक आरोग्यासाठीही.झोप व्यवस्थित आणि पुरेशी झाली नाही तर मेंदूचं कार्य बिघडतं. तसेच पक्षाघात, हदयविकार यासारखे विकारही झोप व्यवस्थित न झाल्यास होवू शकतात. पचनाचे विकार, वायू विकार याचं मूळ कारण झोपेच्या सवयीतच दडलेलं असतं. झोपेच्याबाबतीत झालेलं अलीकडचं संशोधनही झोप नीट घ्या असंच सांगतं. जीवनात जर चांगली उद्दिष्ट्ये ठेवायची असतील, ती उद्दिष्ट जर पूर्ण करायची असतील तर आपल्याला रात्री शांत गाढ झोप येणं खूप गरजेचं आहे.आज जगातले कित्येक लोक केवळ झोप नीट येत नाही म्हणून वैतागलेले आहेत. अनेकजण तर औषधाच्या गोळ्या घेवून झोपतात. पण झोपेसाठी गोळी घ्यावी लागणं हे एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक आहे.वेळेवर चांगली, शांत आणि गाढ झोप येण्यासाठी, झोप पूर्ण होवून सकाळी वेळ जाग येण्यासाठी, सकाळी उठल्यानंतर उत्साह वाटण्यासाठी ‘झोपण्यापूर्वी तुम्ही काय खाता?’ हे खूप महत्वाचं आहे.सकाळी उठल्यानंतर गरम पाणी आणि झोपण्यापूर्वी कोमट दूध या दोन गोष्टी उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. एकूणच आपण काय खातो पितो हे खूप महत्त्वाचं आहे. चांगली झोप येण्यासाठी खाण्या-पिण्याचाच उपयोग करणं जास्त चांगलं. त्यामुळे उत्तम झोपेसाठी मदत करणारे पदार्थ प्रत्येकालाच माहित असायला हवेत.चांगली झोप आणणारे पदार्थ 

1 गरम दूधगरम दूध हे झोप येण्यासाठी चांगली मदत करतं. दूधामध्ये ट्रायपटोफन आणि अमीनो अ‍ॅसिड असतं. जे शरीरात सेरोटोनिन नावाच्या घटकाची निर्मिती करतं. हा घटक मेंदू शांत करतो. चांगल्या झोपेसाठी मेंदू शांत असणं गरजेचं असतं. म्हणूनच झोपण्यापूर्वी कपभर गरम दूध पिणं चांगली सवय आहे.

 

2 केळ

झोपण्यापूर्वी केळ खाणंही चांगलं असतं. केळामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशिअम असतं. या दोन्ही गोष्टींमुळे स्नायूंना खूप आराम मिळतो. केळामध्ये चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या प्रतीचे कार्बोहायडेÑटस असतात. जे शरीरात गेल्यावर चांगली झोप आणण्यास मदत करतात.

 

3 बदाम

बदामामध्येही मॅग्नेशियम हे खनिज मोठ्या प्रमाणात असतं. हे खनिज चांगली झोप येण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. बदामामुळे झोपेच्यादरम्यान शरीरातील रक्ताची पातळी संतुलित राखण्याचं काम बदाम करतं.

 

4 चेरीचेरींमध्ये मेलाटोनीन नावाचा घटक असतो. हा घटक खरंतर मेंदूमधील ग्रंथी तयार करते. हा घटक शांत झोप येण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. हा घटक चेरी खाल्ल्यास मिळू शकतो.

 

 

5 जवसजवसामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात. तसेच ओमेगा 3 आणि ट्रायप्टोफन हे घटकही असतात. हे सर्व घटक चांगली झोप येण्यासाठी मदत करतात. हे घटक मनातील भीती कमी करण्याचंही काम करतात. मन शांत असलं की झोप चांगली येतेच.