शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कितीही पौष्टिक पदार्थ खा, पण पाण्याची सर कशालाच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:41 IST

पाण्याइतकं आरोग्यदायी दुसरं काहीच नाही. तुमचं आयुष्याच ते पाणीदार करून टाकतं.. वाचा या दहा गोष्टी..

ठळक मुद्देशरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठी पाणी उपयुक्त.पाणी आपला मूडही ठेवतं चांगला.पाण्यामुळे त्वचा नितळ राहाण्यास मदत होते.श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होईल दूर

- मयूर पठाडेरोज किती पाणी आपण प्यायला पाहिजे? कोणी सांगतं सहा ग्लास, कोणी म्हणतं सात, कोणी आठ.. डॉक्टरही काही सांगतात. कोणी म्हणतं, असं काही नाही. तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. जास्तही नाही आणि कमीही नाही.. काही जण तर सांगतात, जास्त पाणी उलट पिऊच नये. नाहीतर तुमची तब्येत कधीच सुधारणार नाही. असेच राहाल तुम्ही किरकाडे..मग नेमकं रोज पाणी प्यायचं तरी किती?जाऊ द्या.. ते आपण त्या त्या व्यक्तीवरच सोडू. नाहीतर इथेच भांडणं व्हायला लागतील.पाणी किती प्या, हा जरी प्रश्न असला तरी पाणी पिऊच नका, असं आजवर कोणीही म्हटलेलं नाही. आपल्या शरीरासाठी, शरीराच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठीही पाणी अत्यावश्यक आहे.मग या पाण्याचाच आपण विचार करू.

काय काय फायदे आहेत पाण्याचे?१- पाण्यामुळे आपला थकवा दूर होतो. थकलेले असल्यानंतर पहिल्यांदा आपण पाणी पितो आणि ताजंजवानं वाटायला लागतं ते यामुळेच.२- पाण्यामुळे आपला मूडही चांगला राहातो. मूड स्विंग टळतात.३- डोकेदुखी आणि अर्धशिशीसारख्या प्रकरांवर पाण्याचा चांगला उपयोग होतो.४- अपचन होणं, बद्धकोष्ठता यासारख्या विकारांवरही पाणी उत्तम विरेचक म्हणून काम करतं.५- वजन कमी करण्यासाठी तर पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्या साºयांना माहीतच आहे.६- आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी उपयुक्त ठरतं. घाम आणि लघवीवाटे हे विषारी घटक बाहेर पडतात.७- आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठीही पाणी खूपच उपयुक्त आहे.८- आपल्या त्वचेलाही पाण्याची गरज असते. पाण्यामुळे त्वचा नितळ राहाण्यास मदत होते. ती कोरडी पडत नाही.९- तुम्ही जर मद्यप्राशन करणारे असाल, किंवा केलेलं असलं तर हॅँगओव्हर उतरण्यासाठीही पाण्याचा चांगला उपयोग होतो. पटकन रिकव्हरी मिळते.१०- अनेकांना श्वास दुर्गंधीचा त्रास असतो. त्यांच्या श्वासातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे त्यांच्या जवळपास उभं राहाणंही लोकं टाळतात. श्वासाच्या दुर्गंधीच्या त्रासाची पाण्यामुळे सुटका होऊ शकते.