शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

स्मरणशक्ती वाढवायचीय? - २९ चा पाढा! हा एक अतिशय उत्तम प्रयोग, कसा ते वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 09:33 IST

पाढा पाठ करणे याबरोबर अजून किती तरी मार्गांनी स्वत:ला तपासता येईल. कोणत्याही गोष्टीचा नियमित सराव केल्याने ती गोष्ट स्मरणकेंद्रात नक्कीच जाते.

१९ आणि २९ चा पाढा शाळेतल्या वयात कदाचित लक्षात राहिला नसेल. पण हा पाढा पाठ करण्याचा प्रयत्न नंतरच्या वयात तरी आपण कधी केला का ? की पाठ होत नाही म्हणून सोडून दिला तो दिलाच?... आणि नंतरच्या वयात तर तो पाठ करण्याची गरजच काय म्हणून त्याकडे परत लक्षच दिलं नाही?  - अर्थात असं आपल्यापैकी बहुतेकांचं होतं.

आता, आपलं वय कितीही असो, पाढा पाठ असण्याची गरज नसो, पाढा पाठ करून बघायचं का? २९ चा पाढा पाठ करायला किती दिवस लागतील? हा पाढा रोज, नियमित म्हटला तर  लवकर पाठ होईल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाढा पाठ झाल्यावर सराव केला नाही तर विसरून जाईल का? आपली स्मरणशक्ती चांगली आहे का, हे तपासायचं असेल तर हा एक अतिशय उत्तम प्रयोग आहे.

पाढा पाठ करणे याबरोबर अजून किती तरी मार्गांनी स्वत:ला तपासता येईल. कोणत्याही गोष्टीचा नियमित सराव केल्याने ती गोष्ट स्मरणकेंद्रात नक्कीच जाते. कदाचित तुम्हाला हा रिकामपणचा उद्योग वाटेल पण, आजच संध्याकाळी एखाद्या बागेत जा. तिथे कितीतरी माणसं दिसतील, ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मनातल्या मनात त्यांचं वर्णन करा. वय, पेहराव, चालण्याची पद्धत हे सगळं डोक्यात साठवून ठेवा. घरी गेल्यावर आठवा. स्मरणशक्तीला ताण द्या. यातून आपण स्मरणकेंद्रातल्या पेशींना कामाला लावत आहोत. डोळे मिटून आपल्या घरातल्या एकेका खोलीमध्ये काय आहे, कोणकोणत्या वस्तू आहेत, हे आठवा. एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत घडलेलं दृश्य पुन्हा एकदा आठवा. त्या दृश्यामध्ये काय काय होतं याचं बारकाईने वर्णन लिहून काढा.

अभिनेते – अभिनेत्री आपल्या लक्षात राहातातच. पण त्यांचे कपडे कोणत्या रंगाचे होते, मागच्या भिंतीवर कोणतं चित्र लावलेलं होतं, भिंत, सोफा, पलंग, खुर्च्या कोणत्या रंगाच्या होत्या ? यातलं जास्तीत जास्त आठवायचा प्रयत्न करा. किती गोष्टी आठवल्या ? किती निरीक्षणातून निघून गेल्या ? घराच्या बाहेर असताना आपल्या घरातल्या खिडक्यांच्या गजांचं डिझाइन कसं आहे, आठवतं का?  गोष्टी सजगपणे बघणं याची नियमित सवय लागली की, स्मरणशक्ती वाढतेच.

- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com