शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेस घालवायचाय, मग स्विमिंगला जा!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 17:11 IST

..त्यासाठी तुम्हाला स्विमिंग येत असलंच पाहिजे, असंही नाही!

ठळक मुद्देताण घालवायचा असेल आणि एकदम फ्रेश व्हायचं असेल तर एक उत्तम उपाय म्हणजे स्विमिंग. पोहायला जाणं.रोज थोडा वेळ जरी तुम्ही स्विमिंग केलं तरीही तुमच्या सर्वांगाला व्यायाम मिळेल आणि तुमची दुखणीही पळायला मदत होईल.विशेषत: ज्यांना नैराश्यानं घेरलेलं आहे किंवा बैठ्या कामामुळे अनेक प्रकारची दुखणी ज्यांना लागलेली आहेत, त्यांच्यासाठी स्विमिंग रामबाण उपाय आहे.

- मयूर पठाडेसारखं एकच एक काम केल्यामुळे, एकाच जागी बसून आपलं अंग आंबतं. कंटाळा येतो. स्थूलपणा येतो. काम करायला उत्साह राहत नाही. अशा अनेक गोष्टी.. पण इतकंच नाही, आपलं काम जर बैठं असेल, तर त्यामुळे तुमच्या मनावरचा ताण वाढतो, त्याचा लवकर निचरा होत नाही असंही सिद्ध झालंय. शिवाय एकाच जागी बसल्यामुळे, विशेषत: आॅफिसमध्ये तासन्तास खुर्चीत बसल्यामुळे आपल्या शरीरातील सारं द्रव आणि रक्त पायाकडे साकळतं. त्यामुळे पायही दुखायला लागतात. जड होतात. त्यामुळे तुम्ही इरिटेट होता. मनावरचा ताणही आपसूक वाढत जातो..पण हा ताण घालवायचा असेल आणि एकदम फ्रेश व्हायचं असेल तर एक उत्तम उपाय म्हणजे स्वीमिंग. पोहायला जाणं. रोज थोडा वेळ जरी तुम्ही स्विमिंग केलं तरीही तुमच्या सर्वांगाला व्यायाम मिळेल आणि तुमची दुखणीही पळायला मदत होईल. विशेषत: ज्यांना नैराश्यानं घेरलेलं असतं किंवा बैठ्या कामामुळे अनेक प्रकारचे विघातक बदल शरीरात कळत, नकळत होत असतात, त्यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी पोहणं हा एक उत्तम उपाय आहे.यामुळे तुम्ही केवळ फिटच राहात नाही, तर शरीर आणि मनानंही तुम्ही रिलॅक्स होता. एक नवी ऊर्जा आणि चैतन्य तुम्हाला मिळतं. आपल्या ताणाचा निचरा करायचा तर तो अतिशय उत्तम उपाय आहे.अर्थात यावर कोणी म्हणेल, आम्हाला तर स्विमिंग येतच नाही, मग काय करायचं? शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, पोहायला येत नसलं तरी चालेल, पण पाण्याचा तुमच्या शरीरावर सकारात्मक उपयोग होतो. त्यामुळे तरणतलावावर जाऊन शॅलो पाण्यात डुबक्या मारल्या तरी तुम्हाला तोच इफेक्ट मिळू शकतो.