दृष्टी कमजोर आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 18:37 IST
आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश लोकांना चष्मा लागलेला दिसतो. चष्मा लागण्याचे कारण म्हणजे दृष्टी कमजोर होणे होय. यासाठी खाली काही सोपे उपाय दिले आहेत जे आपणास फायदेशीर ठरतील.
दृष्टी कमजोर आहे का?
आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश लोकांना चष्मा लागलेला दिसतो. चष्मा लागण्याचे कारण म्हणजे दृष्टी कमजोर होणे होय. यासाठी खाली काही सोपे उपाय दिले आहेत जे आपणास फायदेशीर ठरतील. * डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे खूपच फायदेशीर आहेत. याचे नियमित सेवन केल्याने आपल्याला फरक जाणवेल. * नियमित डोळ्यांचा व्यायाम केल्यानेही कमजोर दृष्टीस फायदा होतो. यासाठी डोळ्यांची पुतळी उजवी ते डावी आणि वरून खाली कडे फिरवा.* दर तीन ते चार तासाच्या फरकाने आपले डोळे काही मिनिटांसाठी बंद करा. ही प्रक्रिया नियमित अमलात आणल्याने डोळ्यांना आराम मिळेल. * आपला अंगठा भुवयांच्या मधोमध ठवून काही काळ डोळ्यांना त्या बिंदूवर केद्रिंत करा. या व्यतिरिक्त आपण भीतींवर एखाद्या बिंदूवरही लक्ष केंद्रित करू शकता. हळू-हळू याची प्रॅक्टिस वेळ वाढवा.* दिव्याचा ज्योतीला एकटक बघत राहण्याच्या प्रक्रियेला त्राटक असं म्हणतात. याने दृष्टीत सुधार होतो आणि एकाग्रताही वाढते.* डोळ्यांचे स्नायू स्वस्थ ठेवण्यासाठी डोळ्यांची मसाज आवश्यक आहे. विटामिन इ युक्त तेल किंवा क्रीमने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफडही वापरू शकता.* अंघोळ करताना डोळ्यांना कोमट पाण्याने स्वच्छ करा. थोड्या-थोड्या दिवसाने डोळ्यात गुलाब पाणी घाला.* झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढून ठेवून द्यावे. झोपण्याच्या २ तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवावे.* सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चाला.