शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

ब्रिटनमध्ये शाकाहाराचा ‘५:२ डाएट’ प्लॅन! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 10:23 IST

वास्तवाला पुष्टी मिळणाऱ्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. जगभरात अनेक सर्वसामान्य माणसं  शाकाहाराकडे वळत आहेत. यात आघाडीवर आहे तो ब्रिटन.

शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार श्रेष्ठ?... यावरुन आजपर्यंत अनेक वाद रंगलेले आहेत. अनेक संशोधनंही झालेली आहेत. पण, बहुतांश संशोधनांचं निष्कर्ष हाच , की शाकाहार हा माणसासाठी सर्वश्रेष्ठ आहे. कारण माणसाचं शरीर मांसाहारासाठी तयारच झालेलं नाही. मानवी शरीराला मांसाहार पचवणं अवघड  असतं, त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मांसाहाराने  तुमच्यात ‘ताकद’ येत नाही आणि स्पर्धात्मक खेळांसाठी खेळाडूंना मांसाहार आवश्यकच असतो, असं काही जण म्हणत असले तरी अगदी काही शाकाहारी खेळाडूंनी थेट ऑलिम्पिकची मेडल्स मिळवून या म्हणण्यात काही तथ्य नाही, हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे अनेक खेळाडू मांसाहाराकडून संपूर्ण शाकाहाराकडे वळले असल्याचंही वास्तव आहे. 

या वास्तवाला पुष्टी मिळणाऱ्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. जगभरात अनेक सर्वसामान्य माणसं  शाकाहाराकडे वळत आहेत. यात आघाडीवर आहे तो ब्रिटन. या देशामध्ये आधी मांसाहाराचं प्रमाण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होतं,  पण ते प्रमाण प्रचंड  घटलं आहे. ब्रिटनमध्ये आहारामध्ये आता एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याचं नाव आहे ‘५:२ डाएट’! काय आहे हा प्रकार? म्हणजे आपल्या मांसाहाराचं प्रमाण कमी करताना आठवड्यातून पाच दिवस संपूर्ण शाकाहार घ्यायचा आणि आठवड्यातले फक्त दोनच दिवस मांसाहार कराययचा, तोही कमीत कमी. ज्यांना शक्य असेल, त्यांनी संपूर्ण आठवडाच शाकाहार करावा, यावर आता भर दिला आहे. सुपर मार्केट स्टोअर ‘वेटरोज’ने ब्रिटनमधील अभ्यासावर ‘फूड ॲण्ड ड्रिंक’ हा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या अहवालात ब्रिटनमधील आहारात गेल्या वर्षी काय बदल झाले, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ब्रिटनमधील लोकांशी बोलून प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, हे बघून हा अहवाल तयार केला असल्याचं संयोजकांचं म्हणणं आहे. 

या अहवालात म्हटलं आहे, ब्रिटनमधले जे लोक वारंवार बाहेर हॉटेलात जाऊन खायचे, ज्यांना बाहेरचं खाण्याची आवड होती, अशा लोकांनाही कोरोनाकाळात नाइलाजानं घरात बसावं लागलं आणि घरात तयार झालेलं अन्नच खावं लागलं. हळूहळू त्यांना घरचं अन्नही आवडायला लागलं आणि मुख्य म्हणजे घरच्या स्वयंपाकातच नवनवे प्रयोग होऊ लागले. खवय्यांनाही ते आवडू लागले. त्यामुळे आपली ‘फेवरिट डिश’ बाहेरुन ऑर्डर करण्याचं प्रमाणही बरंच कमी झालं. पॅकेज्ड फूड खाण्यातला लोकांचा इंटरेस्ट कमी झाला आणि होममेड पदार्थांकडे लोकांचा कल वाढला. कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानंतर आणि अनेक ठिकाणी व्यवहार जवळपास पूर्ववत झाल्यानंतर, हॉटेल्स सुरू झाल्यानंतरही लोकांनी बाहेर खायला जाण्याऐवजी, मोठमोठ्या पार्ट्या  करण्याऐवजी घरीच छोट्या छोट्या पार्ट्या आयोजित करायला सुरुवात केली. घरातच छोट्या पार्ट्या करायचा ट्रेंड आता ब्रिटनमध्ये वाढला आहे. त्यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा शॅम्पेनच्या खपातही चाळीस टक्के वाढ झाली. इन्स्टाग्राम आणि टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवरही घरच्या घरी करता येणाऱ्या चवदार डिशेस बनवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं गेलं. त्याच्या रेसिपी व्हायरल झाल्या.  घरीच पास्ता चिप्स बनवण्याच्या टिकटॉक ट्रेंडमुळे एअर फ्रायर्सच्या विक्रीतही यंदा तब्बल चारशे टक्क्यांनी वाढ झाली. फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून अशाच गोष्टी मागवण्याचा लोकांचा कल वाढला, ज्यामुळे घरच्याघरी पदार्थ तयार करता येतील. घरगुती पदार्थ तयार करण्याच्या लहान लहान व्यवसायांतही त्यामुळे वाढ झाली आणि लोकांनी हॉटेलऐवजी अशा लोकांना ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली.  

यू ट्यूब आणि टिकटॉकवर मिळणाऱ्या कुकिंग टिप्स प्रत्यक्षात आणायचा लोकांनीही धडाका लावला. ब्रिटनमध्ये सध्या सुरू असलेल्या हवामान बदल परिषदेच्या निमित्तानंही हा अहवाल ब्रिटनमध्ये महत्त्वाचा मानला जात आहे. पर्यावरणीय समस्यांत वाढ होण्यात मांसाहाराचाही वाटा मोठा आहे, असं अनेक संशोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी खुद्द ब्रिटनचे प्रिन्स चार्लस यांनीही लोकांना आवाहन केलं होतं, मांसाहार आणि डेअरी प्रॉडक्ट्सचा वापर कमी करा आणि शाकाहाराकडे वळा. आठवड्यातले किमान काही दिवस तरी मांसाहार बंद करा, असं आवाहन प्रिन्स चार्लस यांनी केलं. 

‘रेडी टू इट’ पदार्थांच्या विक्रीत घट ब्रिटनमध्ये शाकाहारी ट्रेंड वाढीस लागल्यामुळे लोकं ऑनलाइन सर्चमध्ये हेल्दी फूडचे पर्याय मोठ्या प्रमाणात तपासत आहेत. वेटरोजच्या साइटवरही शाकाहारी पदार्थांची मागणी वाढली आहे. ‘निकरबॉकर ग्लोरी’ या आइसक्रीम डिशच्या ऑनलाइन सर्चमध्ये १७१ टक्के वाढ दिसून आली आहे. तांदूळ आणि व्हिनेगरपासून तयार करण्यात येणाऱ्या ‘सुशी’ या जपानी डिशची मागणी ५४ टक्क्यांनी वाढली आहे. भाज्या आणि मसाल्यांच्या विक्रीत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे सुपरमार्केटमधील ‘रेडी टू इ’ट पदार्थ, सँडविचेस, सॉसेजेस यांचे शेल्फ मागणी नसल्याने भरलेले दिसून येत आहेत. ब्रिटनमधील शाकाहाराचा हा नवा ट्रेंड लोकांना आता चांगलाच पसंतीला उतरत असल्याचं दिसतंय. शाकाहाराच्या पुरस्कर्त्यांनीही त्यामुळे समाधान व्यक्त केलं आहे.